महारांचा लष्करी इतिहास ग्रंथाचे प्रकाशन

32

🔹डॉ. हर्षदीप कांबळे साहेब (IAS- उद्योग सचिव मंत्रालाय मुंबई) यांच्या हस्ते प्रकाशन झाले

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.25मार्च):-क्रांतिभूमी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी व्दारा आयोजित अभिवादन सोहळ्यात प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. प्रेम हनवते यांच्या महारांचा लष्करी इतिहास या बहू चर्चित आणि बहू प्रतिक्षित संशोधन ग्रंथाचे प्रकाशन डॉ.हर्षदीप कांबळे साहेब (IAS- उद्योग सचिव मंत्रालाय मुंबई) यांच्या हस्ते प्रकाशन झाले. डॉ प्रशांत नारनवरे (आयुक्त समाज कल्याण) मा. धम्मज्योती गजभिये (महासंचालक बार्टी)पूज्यनिय भन्ते राहुल बोधी, मा. उमेश सोनावणे (उपायुक्त समाजकल्याण), मा. दिनेश डिंगळे (सचिव सामाजिक न्याय विभाग),बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, वृषाली शिंदे, शाहीर संभाजी भगत आणि बार्टीचे सर्व वरीष्ठ अधिकारी तसेच महार रेजिमेंटचे माजी अधिकारी सैनिक आणि महाराष्ट्रातील असंख्य आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत हा शानदार सोहळा संपन्न झाला.

याकार्यक्रमानंतर लगेच लष्करातील माजी सैनिकांचा मेळावा आणि महाराष्ट्रातील लष्करी घराण्यातील वंशजांचा सन्मान सोहळा डॉ हर्षदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली विजयराव खडसे, (माजी आमदार), भदंत डॉ.खेमो धम्मो, प्रो.डॉ.अनिल काळबांडे, कॅप्टन तुळशीराम सकपाळ, मिलिंद टिपणीस, सुभेदार त्र्यंबकजी इंगळे , गिरीश वानखेडे, शाहीर संभाजी भगत तसेच जयभीम अँपचे सीईओ गिरीश वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.

यावेळी मिलिंद इनामदार (वीर शिदनाक यांचे वंशज कळंबी), मा. बाळासाहेब बेंगळे(बहिरनाक बेंगळे पुरंदर चे किल्लेदार यांचे वंशज), मा.जयेश राजेंद्र गाईकवाड (वीर गोविंद गोपाळ यांचे वंशज), मुकेश जाधव (गोपाळ बाबा वलंगकर यांचे वंशज), मा. अनिकेत कांबळे (शिवराम जानबा कांबळे यांचे पणतू), मा.संतोष भातनकर (गंगाराम कृष्णजी भातनकर यांचे पणतू), रमेश सोनावणे (सुभेदार कृष्णा जी सोनावणे यांचे चिरंजीव),राहुल सोनोने(आंबेडकरी चळवळीतील कार्यासाठी),रामदास लोखंडे (विजय स्तंभ संरक्षण समिती) यांचा सत्कार करण्यात आला.

आयोजन समितीचे प्रमुख नाईक सुधीर चक्रे यांनी प्रास्तविकातून माजी सैनिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले.तर डॉ प्रेम हनवते यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅप्टन तुळशीराम सकपाळ, कॅप्टन साळवी, हवालदार काशिनाथ विनेरकर,सुभेदार अजित न्यायनिर्गुने, महेंद्र गवई नाईक कृष्णा पवार यांच्यासह राहुल सोनोने, विनायक भालेराव, मुकेश जाधव, गजानन दामोधर पंडित वाघमारे, उद्धवराव गायकवाड, गजानन भालेराव, भिमराव कांबळे, सचिन वाघमारे, प्रशांत वाघमारे, भिमराव सोनूले, संतोष निथळे, भारत खंदारे,संविधान हनवते ,साकेत गायकवाड ईत्यादीआयोजक मंडळींनी परिश्रम घेतले.

बार्टी कार्यालयाचे अजित खाडे, सुमेध थोरात, नितीन साहारे,रामदास लोखंडे तसेच महाड येथील राष्ट्रीय स्मारक बार्टीचे व्यवस्थापक प्रकाश जमधाडे, मिलिंद इंगोले, लीना कांबळे यांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.यावेळी महार रेजिमेंटचे माजी सैनिक आणि अनेक साहित्यिक विचावंत आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच माध्यमांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.