अनाठायी खर्च टाळून विधायक कार्यास मदत करून स्मृति जपाव्यात : महेंद्र गायकवाड यांचे प्रतिपादन

29

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

🔸संजय वाघ यांच्या स्मृतीदिनी मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिका ग्रंथ भेट

येवला(दि.25मार्च):- बडेजाव मिरवण्यासाठी अनेक लोक अनाठाई खर्च करत असून लग्न विवाह सोहळे व अनेक प्रकारचे सण उत्सव महोत्सव यात होणारा खर्च हा व्यर्थ जात असून अनाठायी खर्च टाळून विधायक कार्यास मदत करून घर,परिवार व विविध मंडळ संस्था संघटनांनी लोकोपयोगी सार्वजनिक वाचनालय,अभ्यासिका,पाणीपुरवठा योजना-साधन सुविधासाठी आर्थिक-वस्तू स्वरूपात मदत देऊन आपल्या पूर्वजांच्या स्मृति जपाव्यात असे आवाहन महेंद्र गायकवाड अंगणगाव(येवला) येथील सामाजिक कार्यकर्ते संजय वाघ यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.

येथील कॅप्टन विष्णू साळुंखे व लेखक साहित्यिक प्रताप साळुंके यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तिभुमी अभ्यासिका यांस वाचनीय ग्रंथसंपदा भेट देण्यात आली येवला येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येथे सुरू असलेल्या येवला तालुक्यातील शेतकरी कामगार,कष्टकरी,वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मोफत स्पर्धा परीक्षा तयारी केंद्र व मार्गदर्शन सुरू असून या स्तुत्य उपक्रमाची दखल निफाड तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रताप साळुंखे यांनी घेऊन बौद्धाचार्य,धम्म व तथा संविधान संवर्धक महेंद्र गायकवाड सर यांच्या हस्ते व बेबीताई संजय वाघ,संतोष वाघ यांच्या हस्ते ग्रंथ भेट देण्यात आली. मुक्तीभूमी वाचनालय कर्डक अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ यांनी ग्रंथ भेट स्वीकार केली.

प्रथमतः बौद्धचार्य महेंद्र गायकवाड यांनी धम्मप्रवचन दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन मिलिंद गुंजाळ यांनी केले.मुकुंद पगारे यांनी मनोगत व्यक्त केले.अमोल गुंजाळ,शाहीर काशिनाथ चव्हाण यांनी प्रबोधन गीते सादर केली.बाळासाहेब वाघ,राजेंद्र वाघ,रोहन वाघ,बाबासाहेब दूनबळे,संदीप संतोष गायकवाड सोमनाथ मढवई,कवी प्रदीप पाटील,विजय पगारे,निलेश थळकर,शितल पवार,कोमल बच्छाव,सारिका टपाळ,ज्योती ताई दूनबळे,कविता जाधव आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.संतोष वाघ अंगणगांव
ता.येवला (नाशिक)