केजीएफ चॅप्टर 2 चा ट्रेलर रिलीज, सिनेमा ‘या’ तारखेला थिएटरमध्ये होणार दाखल

26

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.28मार्च):-साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा चर्चित चित्रपट KGF: Chapter 1 च्या यशानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चांगलीच वाट पाहत आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता पाहून निर्मात्यांनी याआधीच या सिनेमाचे अनेक पोस्टर्स रिलीज केले आहेत. त्यामुळे ही उत्सुकता हळूहळू वाढू लागली आहे. आता प्रेक्षक या सिनेमाच्या रिलीजसाठी आतुर झाले आहेत. अशा परिस्थितीत आता चाहत्यांची प्रतीक्षा काहीशी संपली आहे, कारण KGF: Chapter 2 चित्रपटाचा ट्रेलर काल यूट्यूबवर रिलीज झाला आहे.

KGF: Chapter 2 मध्ये रॉकी भाई फेम अभिनेता यशचा दमदार अभिनय अगदी जसाच्या तसा या चित्रपटात असल्याचं समजत आहे, हे ट्रेलरमध्ये दिसून येतंय. प्रेक्षकांची मने जिंकणारा हा सिनेमा हिंदी, तेलगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये जगभरात रिलीज होणार आहे. या सिनेमाचा हिंदी भाषेतही ट्रेलर आपल्याला पाहायला मिळेल. हा चित्रपट रिलीज होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. कारण 14 एप्रिल रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.