मागण्या मान्य कामगारांच्या करण्याचे निर्देश

31

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.7एप्रिल):-कोणताही उद्योग हा कामगारांच्या भरवशावर मोठा होतो.मात्र,त्यांच्या मेहनितीवर नफा कमवायच्या आणि मुलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करायचे, असे प्रकार बहुतांश उद्योगात सुरू आहे,उद्योग सुरु ठेवायच्या असेल तर. कामगारांच्या रास्त मागण्या करा,अशा शब्दात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उद्योग कंपनीच्या प्रतिनिधींना खडसावले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सिमेंट उद्योग एकोना माईन व केपीसीएलच्या उद्योग प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळेस जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, कामगार आयुक्त देवेंद्र राम निवासी उपजिल्हाधिकारी विशाल मेश्राम, एसडीओ सुभाष शिंदे व शिवाणी वड्डेटीवार उपस्थित होते.