वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांड्यावरच्या खेळाडुने ‘नॅशनल’ कबड्डीमध्ये नाव कोरलं

46

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.16एप्रिल):;अल्पभूधारक शेतकर्‍याच्या जिरबाज पोराने नॅशनल स्तरावरील कबड्डी स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादीत करत गोल्ड मेडल पटकावले. हा खेळाडू वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांडा येथील रहिवाशी असुन स्थानिक पातळीवर तो उपेक्षित राहिला असला तरी दमदार कामगिरी करून त्यानेे दिल्लीच्या तख्तावर नाव कोरले आहे.वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांडा येथील रहिवाशी आणि अवघ्या कोरडवाहू तीन एकरवर उपजिविका भागवून उदारनिर्वाह करणारे शेतकरी प्रकाश भाऊराव राठोड यांचा मोठा मुलगा अजय प्रकाश राठोड याने जिल्हा, विभागीय कबड्डी स्पर्धा खेळत राज्याच्या अंडर १९ कबड्डी स्पर्धेमध्ये स्थान निर्माण करत नेतृत्व केले आहे.

दि.९ ते १० एप्रिल रोजी दिल्ली येथील गाझियाबाद यठिकाणच्या महामाया स्टेडियमवरच्या मैदानावर देशातील स्पोर्टस् एज्युकेशन ऑफ इंडिया या खेळाडू संस्थेने नॅशनल स्तरावरील कबड्डी स्पर्धेच आयोजन केले होते.या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सोलापूर याठिकाणी संपुर्ण जिल्ह्यामधून चाचणीसाठी खेळाडूंना बोलवले होते आणि याच ठिकाणी नॅशनल खेळाडू निवडले. यात वडवणी तालुक्यातील ब्रम्हानाथ तांडा येथील अजय राठोड या खेळाडूचा नंबर लागला. या स्पर्धेमध्ये २८ राज्यांनी सहभाग घेतला होता.यामध्ये महाराष्ट्र संघाने विजेत पद पटकावले असुन या स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी आणि उत्कृष्ट खेळ हा वडवणी तालुक्यातील भुमिपूत्राने केला असल्याने त्याला गोल्ड मेडल आणि विजेता प्रमाणपत्र देवून त्याचा विशेष गौरव करण्यात आला आहे तर अजय राठोड याने सध्या इयत्ता १० वी बोर्डाची परिक्षा दिली आहे. तर वडवणी तालुक्यातील या विजेता पोराने तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य स्तरावरच्या कबड्डी संघात स्थान निर्माण करत देश पातळीवरच्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत गोल्ड मेडल पटकावले.