मातृदिनाप्रमाणे पत्नीदिन ही साजरा केला पाहिजे- केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.15मे):- जागतिक मातृदिन साजरा करणे हा चांगला उपक्रम आहे. आई चे उपकार कधीही फिटू शकत नाहीत. स्त्रीची अनेक रूपे आहेत. स्त्री चे मातृरूप हे जगात वंदनीय आहे. स्त्री ही शक्ती चे प्रतीक आहे. स्त्रीची आई; बहिण; पत्नी अशी अनेक रूपे आहेत. मातृदिना प्रमाणेच पत्नी दिन ही साजरा केला पाहिजे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

आई ही जन्म देते वाढविते संस्कार देते. तशी पत्नी ही माणसाला साथ देते. संसारात उभी करते. यशस्वी पुरुषा मागे स्त्रीची प्रेरणा आणि साथ असते. त्यामुळे मातृदिना प्रमाणे पत्नीदिन साजरा करून पत्नीचाही गौरव केला पाहिजे. अशी सूचना ना.रामदास आठवले यांनी केली. सांगली मधील राजमती नालगोंडा पाटील कन्या महाविद्यालय येथे राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनामधामणी तर्फे जागतिक मातृदिन निमित्त राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार 2022 चे वितरण ना.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ना.रामदास आठवले बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी विठ्ठल पाटील; मालूश्री विठ्ठल पाटील; रिपाइं चे प्रदेश सचिव आणि माजी महापौर विवेक कांबळे; काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल बापू पाटील; माजी महापौर सुरेश पाटील; विक्रम सावंत; रिपाइंचे सुरेश बारशिंग; रिपाइं जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वसुमती विजयराज ओसवाल; सुशीला कृष्णराव जगताप; उषा दिनेश घाडगे; हारुबाई बयाजी अजेटराव ; भागूबाई मारुती कोळेकर; मंगल बापू तोडकर; शशिकला विश्वनाथ खंबाळकर;संपत्ती विष्णू सोनटक्के; छाया नामदेव पाटील; वैशाली भगवान बोते ;लक्ष्मीबाई शामराव गिड्डे पाटील; या मातांचा राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार 2022 ना.रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करून सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र, मुंबई, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED