महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या शिक्षकांकडून सर्वेक्षण सुरू

30

🔸मोठा माळीवाडा परिसरात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे विशेष शोधमोहीम…..

✒️विशेष प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगाव(दि.16जुलै):– तालुक्यातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव व नूतन प्राथमिक विद्यामंदिर धरणगाव शाळेच्या शिक्षक बंधू – भगिनी यांनी गावात मोठा माळीवाडा परिसरात शाळाबाह्य बालकांच्या विशेष शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. धरणगाव तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी बिऱ्हाडे साहेब व केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी मार्गदर्शन केले. या सर्वेक्षणात शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवायची आहे.याप्रसंगी सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या शिक्षकांनी शोध मोहिमेला सुरुवात केलेली आहे. मोठा माळीवाडा परिसरातील रामलीला चौक, सावित्रीबाई फुले चौक, महात्मा फुले चौक, मोठा माळीवाडा समाज मढी, कलाल वाडा, बाजोट चौक, फुलहार गल्ली, जांजीबुवा गल्ली, ते बालाजी मंदीर या ठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे.

महात्मा फुले हायस्कूलच्या जेष्ठ शिक्षीका पी.आर.सोनवणे, एम.के. कापडणे, एम.बी.मोरे, एस.व्ही.आढावे, एस.एन. कोळी, एच.डी. माळी, व्ही.टी.माळी, सी.एम.भोळे , पी.डी. पाटील, व्ही.पी. वऱ्हाडे, एम.जे.महाजन मॅम, गोपाल महाजन , नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी, पवार सर या शिक्षकांकडून मोठा माळीवाडा परिसरात सर्वेक्षण करण्यात येत आहे.