सुदामभाऊ राठोड यांच्या प्रयत्नाला यश

🔸शासनातर्फे चिटगीर कुटुंबाला चार लाखांची आर्थिक मदत

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.24जुलै):-अतिवृष्टीमुळे जिवती तालुक्यातील गडपांढरवणी येथील मारोती नारायण चिटगीर हे शेतात कामाकरिता गेले असता अचानक पावसाने जोर धरला, ते घरी परतत असतांना अचानक आलेल्या पुरात ११/०७/२२ ला वाहून गेले. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे त्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. शासनाने त्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत द्यावी, यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेच्या वतीने जिवतीचे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले होते.

या निवेदनाची शासनाने तत्काळ दखल घेत आज मयत नामे मारोती नारायण चिटगीर यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी पुलाबाई मोरोती चिटगीर यांच्या परिवाराला संकटाच्या काळात शासनाच्या वतीने ४ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रवीण चिडे, गेडाम मंडळ अधिकारी, गोवर्धन तलाठी नगराळा, व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ यांनी केलेले सहकार्य अमूल्य आहे. व युवा आघाडी चंद्रपूर विभाग प्रमुख सुदाम राठोड यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. व यावेळी मयतच्या परिवाराने शासनाचे, ग्रामस्थांचे व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आभार मानले.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED