पुरोगामी शैक्षणिक सॉफ्टवेअरचे लोकार्पण-एका क्लिकवर सर्व शालेय रेकॉर्ड पाहता येणार

56

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.9सप्टेंबर):-आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात टिकायचे असेल तर अद्यावत राहणे गरजेचे आहे . म्हणूनच सावली तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षक योगेश साखरकर यांनी महा. पुरोगामी प्राथ. शिक्षक संघटना जि. चंद्रपूर यांच्या प्रेरणेने शालेय दैनंदिन रेकॉर्ड सोप्या पद्धतीने व्हावे या हेतूने शैक्षणिक सॉफ्टवेर तयार केले आहे . याचा वापर करून तंत्रज्ञानाचा अनुभव घेता येईल.

या सॉफ्टवेअरचे लोकार्पण ५सप्टेंबर शिक्षकदिनी पुरोगामी समितीचे राज्यनेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्याध्यक्ष महिला मंच अल्का ठाकरे, राज्यसचिव निखिल तांबोळी ,जिल्हा प्रमुख सल्लागार दिपक व-हेकर, जिल्हा नेता नारायण कांबळे, जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार,जिल्हा सरचिटणीस संजय चिडे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे, कार्यालयीन सचिव सुरेश गिलोरकर जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर बोंडे,रवि सोयाम,सुधाकर कन्नाके,लोमेश येलमुले,जिल्हा नेता महिला मंच सुनिता इटनकर,महिला मंच अध्यक्ष विद्या खटी, सरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे,म कार्याध्यक्ष सिंधु गोवर्धन, कोषाध्यक्ष लता मडावी, उपाध्यक्ष पुनम सोरते, सुलक्षणा क्षिरसागर, ,सहसचिव दुष्यंत मत्ते,प्रमुख संघटक नरेश बोरीकर,महिला मंच प्रमुख संघटक ज्ञानदेवी वानखेडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले .

काही समस्या आल्यास 7588550009 या क्रमांकावर संपर्क करावा.हे सॉफ्टवेअर सुरू केल्यावर पहिल्या वेळी enanle content याला क्लिक करावे. हे एकदा साठीच असल्याचे तंत्रस्नेही पुरोगामी शिलेदार योगेश साखरकर यांनी कळविले आहे