मनोज वानखडे यांचे अन्याय अत्याचार निवारण समितीवर तालुका अध्यक्षपदी निवड

25

✒️कारंजा घाडगे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कारंजा(घा)(दि.12सप्टेंबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कारंजा (घा) जिल्हा वर्धा येथे अन्याय अत्याचार निवारण समितीची नुकती सभा संपन्न झाली. ही सभा एससी, एसटी, ओबीसी यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आळा घालण्यासाठी घेण्यात आली होती. सभागृहामध्ये अन्याय अत्याचार समितीचे संयोजक अशोक नागले यांनी मनोज वानखेडे यांचे नाव अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सुचविले असता सभागृहामध्ये उपस्थित बंधू भगिनींनी एकमताने संमती दर्शवून श्री. मनोज वानखडे यांची अध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.

त्यामुळे सभागृहातील उपस्थित बंधू भगिनींनी मनोज वानखडे यांचे अभिनंदन केले. या समितीचा मेमोरांडोम कसा असावा याचे डिटेल्स मार्गदर्शन प्रा. बी.टी. उरकुडे आष्टी यांनी केले. यावेळी संगीता पाटील, वर्षा मनोहर, बबिता शेंडे, सुनीता ढोके, मंदा नागले, रामदास राक्षे, पियुष रेवतकर ,कैलास गौरखेडे, विनोद पाटील, दीपक बागडे, गौतम गवई, योगेश गायकवाड, रामदास बनसोड, लालचंद सोनटक्के, राजेश दहिवडे, सदाशिव मनोहरे, विजय कांबळे, शरद कांबळे, लक्ष्मण वाळके, शीलवंत ठाकरे ,नीरज माहुरे, गोवर्धन पाटील आदींची उपस्थिती होती.