वेंकटेश नगरीत औदुंबर वृक्षाचे वृक्षारोपण

30

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.21सप्टेंबर):-दि. 21/09/22 रोज बुधवारला सकाळी 08 वा. व्यंकटेश नगरीच्या खुल्या प्रांगणात महानुभाव पंथाचे गुरुवर्य आदरणीय गौरव मुनी सुधाकर संन्यासी बाबा यांच्या शुभहस्ते औदुंबर (उंबर) वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. इथे पंचवटी तयार करण्याचा प्रयत्न येथील नागरिक करीत आहेत. यापूर्वी वटवृक्ष पिंपळ बेल आवळी यांचे वृक्ष होती. त्यामुळे औदुंबर वृक्षाची गरज या ठिकाणी होती. ती गरज वृक्षपर्यावरण मित्र किसनराव सूर्यवंशी सर यांनी औदुंबरवृक्ष देऊन पूर्ण केली.त्यामुळे या नगरात खुल्या प्रांगणात पंचवटी तयार होत आहे.

खरोखरच वृक्ष लागवडीतून पर्यावरण जोपासण्यास मदत होते व मानवास आवश्यक असणारा प्राणवायू मिळतो. आपण सर्वांनी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून वृक्ष लागवड करावी असा संदेश ह. भ. प. सेवानिवृत्त शिक्षक श्रीराम चव्हाण सर यांनी दिला. यावेळेस दिगंबर माने सर संजय कदम अभिलाष वानखेडे संतोषराव कनवाळे गंगाधर देवसरकर मुनेश्वर साहेब व सर्वांची लाडकी कु. आराध्या वानखेडे ही बालिका उपस्थित होती. वृक्ष लावगड केल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.