विजयादशमी (दसरा) सण व सध्याची मानवाची मानसिकता बदलणे आवश्यक

15

विजयादशमी म्हणजे अश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो .याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते……..

देवीच्या घटांची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते………..
*पौराणिक कथा**
________________
*या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले अशीही आख्यायिका आढळून येते….. पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे सेमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने वीराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले. आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले …अशी कथा आढळून येते. त्यामुळे विजयादशमीला सेमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते…………..
*श्री रामाने विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे.
विजयादशमीच्या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला संस्कृत भाषेत
*अस्मंतक** असे म्हणतात
.
रामायणा नुसार रावणाने सीतेचे अपहरण केले आणि तिला लंकेला घेऊन गेला. भगवान रामाने रावणाला सीतेला सन्मानाने परत करण्यासाठी आव्हान केले. रावणाने सीतेला परत करण्याचे नाकारले व शेवटी राम व रावणामध्ये युद्ध सुरू झाले. रावणाला ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मिळाले असते परंतु विभीषणाच्या सल्ल्यानुसार राम रावणाचा वध करतो. या दिवशीची आठवण म्हणून सत्याचा असत्यावर विजय, न्यायाचा अन्यायावर, तसेच नीतीचा अनितीवर विजय म्हणून या दिवशी भारतात अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जातो.

*नवरात्री निमित्त उत्सव**
_____________
महाराष्ट्रात देवींच्या घटांची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्रात नऊ दिवस जत्रेचे आयोजन केले जाते. उमरखेड येथील जगदंब देवी मंदिरावर नऊ दिवस संपूर्ण उमरखेड तालुक्यातील भाविक भक्त दररोज सकाळी 5 वाजता पासून ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी येतात. लहान बाळ गोपाळ यांना जत्रेतील ज्या वस्तू आवडल्या त्या खरेदी केल्या जातात. जवळपास 20 ते 25 कुटुंबाचा या जत्रेवर उदरनिर्वाह चालत असतो. दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो या दिवशी सेमीच्या म्हणजेच आपट्याच्या झाडाची पाने तोडून मित्रमंडळी वरिष्ठ मंडळी आदर्श व्यक्ती यांना देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. मौल्यवान वस्तू, घर, सोने ,मोटरसायकल, कार अशा वस्तू खरेदी करून आनंद द्विगुणीत केला जातो.
*आपट्याचेआयुर्वेदिक फायदे **_______

आपट्याची पाने तुरट, आंबट शीतल असतात या पानाचा उपयोग तंबाखूची विडी, कफ व पित्त ,वात ,कंठरोग, रक्तदोष, विषमज्वर, अतिसार कर्करोग दोषावर गुणकारी आहे. मित्रमंडळींना देत असताना हाताशी संपर्क येतो व कफ व पित्त यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन तयार केला जातो. तोच प्राणवायू आपण वापरतो. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने तोडून आणणे , देवाजवळ ठेवने, इष्टमित्र वडीलधारी व्यक्तींना देऊनआशीर्वाद घेतला जातो.
*व्यवसायांची संधी*____________________
झाडाची कत्तल करून झाड तोडून व्यवसायच सुरू करण्यात आलेली आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिर व मंदिराच्या परिसरात आपल्याला आपट्याच्या फांद्या इतरत्र पडलेल्या दिसतात.

खेड्यामध्ये संपूर्ण झाडांची फांदी उकंड्यावर टाकण्यात येतात .या पद्धतीने आजची अवस्था आहे. परंतु ते झाड वाढण्यासाठी किती कालावधी लागला असेल ,याचा मुळीच विचार करत नाही. झाड तोडताना झाडावर असलेली पक्षी, पक्षांचे खोपे यांचाही विचार करणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा पक्षी न उठवता झाड तोडले जाते. पक्षी मृत्युमुखी पडतात. याची जाणीव जागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपट्याची झाडे नष्ट होत आहेत . केवळ काही रुपयासाठी पूर्ण झाड तोडने म्हणजे माणुसकी विसरणे होय
*”देरे हरी पलंगावरी “*
शहरी भागात राहणारे लोक जीवाला त्रास न देता , पळसाची मेढी असेल दूर्वा असेल किंवा आपटा असेल विकत घेतात., म्हणून गरीब व्यक्ती झाडाच्या फांद्या तोडून आणतो व चौकात उभे राहून विकतो मग तो गणपती असो पोळा असो किंवा दसरा असो आणि म्हणून वृक्षतोड होत आहे याला केवळ शहरी भागातील सुशिक्षित व्यक्ती, कर्मचारी व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती जबाबदार आहे असे वाटते .
शासन एकीकडे
” झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा “
हा संदेश देत आहे तर सामान्य जनता स्वतःच्या पोटाची खळगी भरण्या करिता झाड तोडत आहेत. हे योग्य वाटत नाही….. नागरिकांनी केवळ झाडाची पूजा करून पानेच घ्यावीत फांदी तोडू नये वाटल्यास पौराणिक कथेची आठवण म्हणून आपट्यांचे झाड झाडांची वृक्षरोपण करून किंवा आपट्याचे रोप भेट देऊन विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण आनंदाने साजरा करावा. आपट्याचे झाड वाचवा दसरा साजरा करा.

✒️किसन श्रीराम सूर्यवंशी(महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड)मो:-9404373146