धम्‍मचक्र अनुप्रवर्तन महोत्‍सवानिमित्त सुमधुर बुध्‍द भीमगीतांची मेजवानी-सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

    52

    ? सुप्रसिध्‍द गायक आनंद शिंदे आणि पार्श्‍वगायिका वैशाली माडे यांची उपस्थिती

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    चंद्रपूर(दि.15ऑक्टोबर):-66 व्‍या धम्‍मचक्र अनुप्रवर्तन महोत्‍सवानिमित्त सांस्‍कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे 16 ऑक्‍टोबर रोजी सायं. 7 वा. सुप्रसिध्‍द गायक आनंद शिंदे व पार्श्‍वगायिका वैशाली माडे यांच्‍या बुध्‍द भीमगीतांच्‍या सुमधूर कार्यक्रमाचे भव्‍य आयोजन करण्‍यात आले आहे.

    सांस्‍कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांस्‍कृतिक कार्य संचालनालयाच्‍या माध्‍यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आनंद शिंदे हे विख्‍यात गायक असून लोकगीतांच्‍या क्षेत्रात त्‍यांनी आपल्‍या गायकीचा ठसा उमटविला आहे. पार्श्‍वगायिका वैशाली माडे या हिंदी व मराठी चित्रसंगीतातील आघाडीच्‍या गायिका आहे. मराठी व हिंदी सारेगमप या कार्यक्रमाच्‍या त्‍या विजेत्‍या ठरल्‍या आहेत.

    बुध्‍द भीमगीतांच्‍या या सुमधुर कार्यक्रमाला नागरिकांनी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन सांस्‍कृतिक कार्य संचालनालयाद्वारे करण्‍यात आले आहे.