अतिक्रमण हटाव मोहिमेत घुडदुंग घालून शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला एक दिवसाचा पिसीआर

32

🔹राष्ट्रीय नगर परिषद कर्मचारी युनियनचे एक दिवसासाठी काम बंद आंदोलन
__________________________
🔸अतिक्रमण धारकांकडून शिवीगाळ करीत भ्याड हल्ला केल्याचा संपूर्ण तालुक्यात निषेध
___________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.26डिसेंबर):- येथील डॉ,बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी चौकापर्यत नगर परिषदने राबविलेली अतिक्रमण हटाव मोहिमे दरम्यान मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड यांच्यावर झालेल्या भयाड हल्ल्याचा निषेधार्थ राष्ट्रीय नगर परिषद कर्मचारी युनियन कडून एक दिवसाचे काम बंद आंदोलन करण्यात आले होते. दि.२३ डिसेंबर २०२२ रोजीच्या दुपारी १२ ते १२.३० वाजताच्या दरम्यान अतिक्रमण काढताना अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीला दि.२४ डिसेंबर २०२२ रोजी पुसद न्यायालयात हजर केले असता एक दिवसाचा रविवारी पर्यंतचा पीसीआर मिळाला आहे.

जलील बागवान व त्याच्या इतर सहकार्याविरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे.गुन्हे दाखल झालेल्या जलील बागवान या आरोपीला अटक करून पुसद न्यायालयात दि.२४ डिसेंबर रोजी हजर केले एक दिवसाचा पीसीआर सुनावला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते गांधी चौक दरम्यान अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविल्या जात होती. अशावेळी अतिक्रमण काढण्याकरिता गेलेल्या अतिक्रमण पथकावर व नप चे मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांच्यावरही अतिक्रमणधारकांनी हात गाडी ढकलून दिली होती.त्या भयाड हल्ल्याचा राष्ट्रीय नगर परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष गणेश डांगोरिया,कार्यकारी अध्यक्ष प्रशांत देशमुख,उपाध्यक्ष रमेश नाळे व फिरोज पठाण यांच्यासह सचिव नजीद खान यांनी निषेध नोंदवित यवतमाळ जिल्हाधिकारी यांना दि.२४ डिसेंबर २०२२ रोजी निवेदन दिले होते.

निवेदन देत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारले होते.अतिक्रमण मोहीम हटाव मोहीम सुरू असतांना जलील बागवान व त्यांच्या साथीदारांनी धमकाविलीचा आरोप केला असुन शहर पोलीस स्टेशनमध्ये मुख्याधिकारी यांनी तक्रार दिली होती. तक्रारीत जलील बागवान व त्याच्या इतर साथीदारांनाही मी मुख्याधिकारी असल्याचे सांगून देखील शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. आरोपी व त्याच्या साथीदारांनी धक्काबुक्की करत हातगाडा मुख्यधिकारी डॉ.सुकलवाड यांच्या अंगावर ढकलून दिल्याने त्यांना दुखापत झाली होती. डॉ.आंबेडकर चौक ते गांधी चौक येथे अतिक्रमण हठवीत असतांना जलील बागवान व त्याचे इतर साथीदारांनी धमकी देऊन शिवीगाळ केली असेही तक्रारीत नमूद आहे.