रानटी हत्तीने केलेल्या नुकसानीची तातडीने नुकसान भरपाई करा – आशिष अग्रवाल

95

✒️कोरची(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोरची(दि.8जानेवारी):-छत्तीसगड राज्यातील मोहला, मानपुर या परिसरातून कोरची व कुरखेडा तालुक्यात रानटी हत्तींनी खूप धुमाकूळ घातला असून यामुळे बहुतेक लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या 21,22 व 23 तारखेला 20 ते 25 रानटी हत्तींनी कोरची तालुक्यातील लेकुरबोडी येथे शेतीचे व काही घरांचे प्रचंड नुकसान व नासधुस केले ज्यामुळे काही लोकांचे संसार उघड्यावर आले व काही लोकांनी आपला उदरनिर्वाह करावा तरी कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लेकुरबोडी येथे हत्तींनी केलेल्या नासधुसीमध्ये चंदरसाय नैताम (एक एकर), रामसु बोगा (घर उध्वस्त) सरजुराम नैताम (दोन एकर), लालसाय नैताम (घर उध्वस्त) सनकोबाई नरेटी (जखमी), रत‍नीबाई नरेटी (दोन एकर), श्रीराम नरेटी (दीड अशी), सारजेबाई मडावी (एक एकर), दलसू नरेटी (दोन एकर), दानसिंग हिडको (एक एकर), पुनाराम गावडे (एक एकर), सबेसिंग कुमरे (दोन एकर) अशी पीडितांची नावे असून यांचे पंचनामे सुद्धा वन विभागाच्या अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आलेले आहेत. परंतु अजून पर्यंत त्यांना याचा मोबदला न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊन ठेपली आहे. पिढी पीडितांपैकी एकाच्या मुलीचे लग्न नुकताच काही दिवसांनी असल्यामुळे त्या वडिलांनी लग्नाची तयारी करावी तरी असा? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

मागील दोन वर्षांमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे पहिल्याच लोकांची हातावर पोट अशी परिस्थिती निर्माण झाली असून अशात अख्ख्या आयुष्याची कमाई आपल्या शेतावर लावणार्या शेतकऱ्यांवर आभाळ कोसळल्यागत झाले आहे. सर्व पीडितांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती कोरचीचे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल यांनी केली आहे.

 

*कोट*

लेकुरबोडी येथे रानटी हत्तीने केलेल्या नुकसानीचे पंचनामे झाले असून त्यांची माहिती वरिष्ठांना पाठवली आहे व त्यांना मोबदला मिळावा याकरिता पाठपुरावा करण्यात येत आहे.

*लक्ष्मीकांत ठाकरे*
*वनपरिक्षेत्र अधिकारी*
*वनपरिक्षेत्र कार्यालय, बेडगाव*