आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुरच्या वतीने काग येथे “चला जाणूया नदीला” अभियाना अंतर्गत श्रमसंस्कार शिविराचे आयोजन

63

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.16जानेवारी):-आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुरच्या वतीने १७ ते २३ जानेवारी या कालावधीत नगर परिषद चिमुर अंतर्गत येणाऱ्या मौजा काग येथे “चला जाणूया नदीला” अभियाना अंतर्गत श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे.

दिनांक १८ जानेवारीला शिविर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणुन ग्राम युवक मंडळ पेठभान्सुलीचे सदस्य डॉ. केदारसिंह रोटेले, विशेष अतिथी नगर परिषद चिमुरच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रीया राठोड, पंचायत समिती चिमुरचे संवर्ग विकास अधिकारी राजेश राठोड, प्रमुख अतिथी प्रभु फाऊन्डेशन चंद्रपूरचे अध्यक्ष राहुल गुळघाणे, माजी सिनेट सदस्या किरणताई रोटेले, आरेंज सिटी महाविद्यालय नागपूरच्या सदस्या काजोल रोटेले, प्राचार्य डॉ. शुभांगी वडस्कर, गुरुदेव सेवा मंडळ कागचे अध्यक्ष अविनाश धोंगडे, माजी नगरसेवक अरुण दुधनकर, मुख्याध्यापक गिरडे आदी मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.

शिबिरात होणाऱ्या बौध्दीक कार्यक्रमात प्राचार्य शुभांगी वडस्कर, प्रा. शिल्पा गणवीर, जोत्सना सिंगनजुडे, नोडल अधिकारी पवन देशशेट्टीवार, नदी प्रहरी सदस्य अजय काकडे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. विणा काकडे, प्रा. हेमंत वरघने, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोपाल भगत, डॉ. संजय पिठाडे, विभागीय समन्वयक प्रा. पितांबर पिसे, डॉ. गजानन बन्सोड, राईड संस्थेचे अध्यक्ष अमित भिमटे, ग्रंथमित्र सुभाष शेषकर आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

दिनांक २२ जानेवारीला होणाऱ्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शुभांगी वडस्कर, प्रमुख अतिथी डॉ. सुनिल झाडे, डॉ. राजु कसारे, गुरुदेव सेवा मंडळ कागचे अध्यक्ष अविनाश धोंगडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिबिराला सहकार्य करण्याचे आवाहन कागवासीयांनी केले आहे.