दोन दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

33

🔸दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा यवतमाळ पच्छिमचा पुढाकार

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.29जानेवारी):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संरक्षण विभाग जिल्हा शाखा यवतमाळ वतीने सुभेदार रामजी बाबा स्मृतिदिनानिमीत्य दि.१फेब्रुवारी ते दि. २ फेब्रुवारी पर्यंत बोधिसत्व बुद्धविहार यवतमाळ येथे दोन दिवसीय १०० समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. असुन या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून के.एम.हेलोडे लेप्टनंट जनरल समता सैनिक दल बुलढाणा व आर.ओ.सावंत लेप्टनंट कर्नल समता सैनिक दल बुलढाणा हे उपस्थित राहतील राहतील.

कार्यक्रमाची रूपरेषा दि.१ फेब्रुवारी रोजी वेळ १०ते ११ पर्यंत सैनिकांच्या नोंदणी मोहन भवरे तालुकाध्यक्ष शाखा यवतमाळ हे करतील.सिद्धार्थ बनसोड उपाध्यक्ष तालुका शाखा यवतमाळ,
गौतम कुंभारे सरचिटणीस तालुका शाखा यवतमाळ कडे नोंदणी फी १००रुपये प्रमाणपत्र फी ५०रुपये सभासद फी २०रुपये एकुण रूपये १७० रुपये जमा करावी.सकाळी ११ ते १पर्यंत कार्यक्रमाचे उद्घाटन होईल.

दुपारी १पासुन रात्री ८पर्यन्त विविध विषयावर मार्गदर्शन आणि मैदानावर परेड ,सांस्कृतिक कार्यक्रम ईत्यादी रात्री ८ते ९पर्यंत सामुहिक भोजनदान रात्री १०वाजता पासुन रात्रभर विश्रांती
दि. २फेब्रुवारीला सकाळी ४ते ६ वाजता स्नान ईतर विधी सकाळी ६ ते ८पर्यंत मैदानावर पिटी परेड गार्ड ऑफ ऑनर ची प्राथमिक ओळख करून देण्यात येईल.सकाळी ८ ते ९नास्ता व चाय मिळेल. सकाळी ९ते १२पर्यंत विविध विषयाची माहिती मिळेल.
दुपारी १२ ते १ पर्यंत सामुहिक भोजनदान होईल.
दुपारी १ते २पर्यंत लेखी परिक्षा संपन्न होईल.दुपारी २ ते ५ पर्यंत मनोगत तथा सांगता समारोह संपन्न होईल.

महत्वपुर्ण सुचना दि.१फेब्रुवारीला यवतमाळ च्या सर्वच सैनिकांनी भोजन करून यावे मात्र तालुक्यातील तालुका पातळीवरील सर्व सैनिकांनी एक वेळ चा भोजनाचा डब्बा न विसरता आणावा.यवतमाळ येथील महीला सैनिकांना रात्री भोजनानंतर घरी जाण्यासाठी परवानगी मिळेल.मात्र त्यांनी सकाळी सकाळी ६ वाजता शिबिराचे स्थळावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.तालुक्यातील तमाम सैनिकांनी सोबत आंघोळीचे साहीत्य/चादर/ब्लँकेट/आवश्यक असलेली औषधी/माहीती लिहीण्यासाठी एक वही/पेन सोबत आणने आवश्यक आहे.पुरूष व महीला सैनिकांनी शक्यतोवर युनिफॉर्म तयार करणे बंधनकारक आहे.
पुरूष सैनिकांनी दाढी वाढऊन येऊ नये दाढी व बारीक कटींग करून यावे. वेळोवेळी दिलेल्या सुचनेनुसार सहकार्य करावे लागेल.समता सैनिक दलाच्या शिस्तीचे तंतोतंत पालन करून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शिस्तीचे पालन करावे. या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा यवतमाळ पश्चिम यांनी केले आहे.