रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदिस्त पुतळा जयंतीदिनी दर्शनासाठी उपलब्ध करावा – अनिल नरवाडे

26

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 11 फेब्रुवारी):-एक वर्षाहुन अधिक काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नगर परिषदेच्या हॉलमध्ये बंदिस्त असुन महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची दि.19 फेब्रुवारी रोजी जयंती असल्याने प्रशासनाने बंदिस्त पुतळा तमाम शिवभक्तांना दर्शनासाठी मोकळा करावा अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे माजी सदस्य अनिल नरवाडे यांनी उपविभागिय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा मागिल एक वर्षाहुन अधिक काळापासून नगर परिषद हॉलमध्ये बंदिस्त आहे . त्यावर धुळ साचत असून जाळ्या लागल्या आहेत.अशा प्रजाहितदक्ष आदर्श राज्यकर्त्या राजाला प्रशासनाने किमान त्यांच्या जयंतीदिनी स्वच्छता करून श्रध्दाळुंच्या भावनांचा सारासार विचार करून दि. 19 फेब्रुवारी रोजी जयंतीच्या औचित्याने किमान एक दिवसासाठी शिवभक्तांना दर्शनासाठी उपलब्ध करावा अशा मागणीचे निवेदन शिवप्रतिष्ठानचे माजी सदस्य अनिल नरवाडे यांनी उपविभागिय अधिकाऱ्यांना दिले आहे.