चकलांबा येथे सायबर गुन्ह्या संदर्भात मार्गदर्शन

29

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.13फेब्रुवारी):-सायबर गुन्ह्याबाबत घ्यायची दक्षता आणि महिला सुरक्षा विषयक कायदे याबाबत विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले चकलंबा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व ज्ञानदीप कॅम्पुटर यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवारी शिबिर व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. या कार्यशाळेत चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी सायबर क्राईम आणि सेक्युरिटीबाबत माहिती दिली.

तसेच पासवर्ड ठेवताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करत फेसबुक, गुगल, पॅन कार्ड, आधार कार्ड, तसेच मोबाईलच्या वापराचा कसा गैरवापर होतो. याबाबत सर्वांना सावध केले दरम्यान सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस कसे वाढत आहे. हे उदाहरणासह सांगितले त्यामुळे भविष्यात असे प्रकार होऊ नयेत. म्हणून कोणती काळजी घ्यावी सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करावा.

याविषयी देखील सविस्तर मार्गदर्शन करून व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वर कुठलीही अनोळखी लिंक ओपन करू नये सोशल मीडियावर संवेदनशील माहिती अपलोड करू नये, अनोळखी अपरिचित लोकांच्या रिक्वेस्ट घेणे टाळावे आदी महत्वपूर्ण सूचना सपोनी एकशिंगे यांनी यावेळी दिल्या या कार्यशाळेस अमोल येळे, शाळेचे मुख्याध्यापक गरबडे सर, एमकेसीएलचे मार्केटिंग ऑफिसर अजित धनवे, कार्यक्रमाचे आयोजक माऊली खरे, शाळेचे देशमुख, राऊत सर, ढाकणे सर, आहेर सर, गवांदे सर, शिंदे सर आदिंची उपस्थिती होती