भारतीय राज्यघटना वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : आम. सतेज पाटील

35

🔹ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांचा नागरी सत्कार

🔸क्रियेटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्रा पुरस्काराचेही वितरण

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.6मार्च):-आजच्या काळात भारतीय संविधान धोक्यात आले आहे की काय अशी परस्थिती निर्माण झाली आहे. संवेदनशील व जागृत माणसांनी एकत्र येऊन भारतीय राज्यघटना वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असे प्रतिपादन आम. सतेज पाटील यांनी केले.ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राज्याध्यक्ष आणि कामगार नेते सुरेश केसरकर यांचा जाहीर नागरी सत्कार प्रसंगी बोलत होते.

यावेळी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे क्रियेटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्रा या राज्यस्तरीय पुरस्काराने अजय दळवी, चंद्रकांत मोरे, सुधाकर सावंत, गौरी मुसळे, संजय सासणे, जॉर्ज क्रूझ, अशोक आलदर, शिवाजी चौगुले, छाया पाटील, नारायण धनगर, बाजीराव हेवाळे, रवींद्र श्रावस्ती, डॉ. उज्वल कोठारकर, प्रा. डॉ. हाशिम वलांडकर, शंकर अंदानी, मंगल श्रावस्ती, शंकर पुजारी, डॉ. सागर सानप, प्रा. माधव आग्री, चंद्रकांत सावंत, मोनिका तारमळे, डॉ. संदीप गायकवाड या मान्यवरांचा आम. सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी निर्मिती विचारमंच, कोल्हापूरचे अध्यक्ष व कार्यक्रममाचे निमंत्रक अनिल म्हमाने, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सचिव दिलीपदादा जगताप, ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रा. डॉ. श्रीपाद देसाई, खाजगी प्राथमिक शिक्षण सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. सुरेश केसरकर नागरी सत्कार समिती, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र, नवश्रमिक सोशल फौंडेशन, महाराष्ट्र आणि निर्मिती फिल्म क्लबच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील कामगार वर्ग उपस्थित होता.मानपञाचे वाचन ॲड.करुणा विमल यांनी केले, प्रस्तावित व स्वागत अनिल म्हमाने यानी केले तर सुञसंचालन स्वप्निल गोरंबेकर यांनी केले, आभार सुनिल कांबळे यांनी केले.