महात्मा फुले हायस्कूल मध्ये ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतींना अभिवादन !…

35

🔸महिलांना खऱ्या अर्थाने गुलामीतून मुक्त करणाऱ्या सत्यशोधिका सावित्रीमाई फुले – एच.डी.माळी

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.10मार्च):- शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा काढणाऱ्या, भारतातील थोर समाजसेविका, भारतातील प्रथम महिला मुख्याध्यापिका व शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या आद्य जनक, विद्येची खरी देवता, स्फुर्तिनायिका,ज्ञानज्योती, महानायिका, विचारवंत, शिक्षणतज्ञ, आद्य कवयित्री, आईसाहेब क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
प्रस्ताविक पी डी पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक एम बी मोरे होते. पर्यवेक्षक,शाळेतील उपशिक्षिका एम जे महाजन व मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील क्रीडा शिक्षक एचडी माळी यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य विद्यार्थ्यांना विस्तृतपणे सांगितले. शिक्षणाचे कार्य करत असताना अनेक अडचणींना माईंना सामोरे जावे लागले पण त्या डगमगल्या नाहीत खऱ्या अर्थाने महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम सावित्रीमाई फुले यांनी केले आहे.

केशवपण, सतीची चाल, बालविवाह या कूप्रथा त्यांनी आपले पती महात्मा जोतीराव फुले यांच्यासोबत सामाजिक कार्य करत असताना बंद केल्या. सावित्रीमाई फुले आद्य कवयित्री विचारवंत होत्या. आज त्यांच्या विचारांवर चालण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे असे प्रतिपादन माळी यांनी केले.याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक एम.बी मोरे, ज्येष्ठ शिक्षक सी एम भोळे, एस व्ही आढावे, पी डी पाटील, व्ही टी माळी, श्रीमती व्ही.पी.वऱ्हाडे, नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी, अरुण शिरसाठ, तुषार पाटील, जीवन भोई तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एस व्ही आढावे यांनी मानले.