कैवल्यदानी भक्तगण समूहा द्वारे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे एकदिवसीय सामुदायिक पारायण सोहळा संपन्न

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.4मे):-श्री गजानन महाराज शेगाव यांच्या भक्तीमार्ग आणी सेवा याचं व्रत घेऊन स्थापन झालेला कैवल्यदानी भक्तगण समूहा द्वारे नुकतंच श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील शेगाव संस्थानच्या श्री गजानन महाराज मंदिरात शनिवार दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी एक दिवसीय विशेष सामुदायिक पारायण सोहळा संपन्न झाला.वेगवेगळ्या ठिकाणाहून भक्तगण मंडळीनी येऊन इथे पारायण सोहळ्यात सहभाग घेतला. सुंदर नियोजन करुन हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला.

कैवल्यदानी भक्तगण समूह व्हाट्सअप ग्रूप द्वारे महाराजांची भक्तिमार्गाने नित्यनेमाने सेवा करीत आहे. वेग वेगळे उपक्रम राबवून महाराजांची सेवा ह्या ग्रूप द्वारे होतं आहे. साधारण 700 च्या आसपास भक्तगण ह्या ग्रूपला जोडले गेले असून शेगाव संस्थान द्वारा निर्मित वेगवेगळ्या मंदिरात सामूहिक पारायण केल्या जात असून यात महाराष्ट्र आणि इतर राज्यातील भक्त सहभागी होवून गजानन माऊली ला पारायण सेवा समर्पित करतात अशी महिती उदयकुमार सुर्वे बोरिवली मुंबई यांनी दिली आहे.

कैवल्यदानी समूहा द्वारे अधिक मास श्रावणाचे औचित्य साधून पुढिल पारायण श्री क्षेत्र शेगाव नगरीत करण्याचे ठरविण्यात आले आहे. आणी ह्यापुढे दरवर्षी श्रावणात शेगाव येथे पारायण करण्याचे ठरविले आहे.

ह्यावर्षी अधिक मास श्रावण असल्याने त्या महीन्यात एकदिवसीय सामुदायिक पारायण करीत असल्याचे सांगण्यात आले. हे पारायण दिनांक 5 ऑगस्ट 2023 शनिवार रोजी होईल असे सर्व भक्तजनास कळविण्यात येत आहे.लवकरच पारायण संबधीत सर्व माहिती ग्रूपवर येईल. तसेच नांव नोंदणी एक जून पासून केली जाईल. माहितीसाठी असे भक्तजनांना सांगण्यात येत आहे.