बाळापुरच्या जंगलात आढळला मृतदेह

42

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.8मे):- नागभीड तालुक्यातील बालापुर येथील जंगलात मृतदेह आढळल्याने चर्चेला उधान आले आहे. वाट्स अपच्या माध्यमातून मृतकाचे फोटो प्रसारित करण्यात आले. त्या फोटोच्या आधारे घरच्या लोकांनी बाळापुर येथील जंगला शेजारी शोध घेतला असता मृतक हा आपलाच मुलगा असल्याने कपड्या वरुन ओळखले.

मृतक हा नागभीड तालुक्यातील पाहार्णी येथील असून त्याचे नाव राजु वासुदेव मेश्राम वय ४३ वर्ष असे आहे. मृतक हा दोन महीन्यापासुन बेपत्ता होता. या बाबतची मीसींग रीपोर्ट पोलीस स्टेशन नागभीड येथेमयताचे लहान भावानी यांनी दिली होती. मृतकाला आई, वडील असुन दोन भाऊ आहे. तसेच मृतकाला एक मुलगा आहे. अधीक तपास पो. स्टे. नागभीड करीत आहे.