पत्रकारांसाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती करावी – डॉ. राजन माकणीकर Create an independent constituency for journalists

36

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.10मे):- राज्यातील पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पदवीधर शिक्षक मतदार संघा च्या धर्तीवर पत्रकारांसाठी सुद्धा स्वतंत्र मतदार संघ द्यावा जेणेकरून पत्रकारांना हक्काचे संरक्षण मिळेल त्यांना ही संविधानिक जवाबदारी प्राप्त होईल. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाच्या डॉ. राजन माकणीकर यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावं शिंदे यांना आर पी आय संविधान पक्षाच्या वतीने विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी मागणी केली आहे की,गृहनिर्माण, विमा, कर्ज योजना, शासकीय जाहिरात, मुल-मुलींच्या शिक्षणात सवलत, बस-रेल्वे-विमान प्रवास सवलत, भविष्य निर्वाह निधी, मानधन, जाहिरातींचे शिल्लक बिल देयक, टोल माफ, यु ट्यूब, पोर्टल व सोशियल मीडिया प्रतिनिधींना इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया सारखी अधिकृत मान्यता, स्वतंत्र पारितोषिक आणी सन्मान आणी अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून घेता येईल या साठी स्वतंत्र मतदार संघ हवा जेणे करून निवडून आलेला प्रतिनिधी जाणीवपूर्वक या या बाबींची दाखल गांभीर्याने घेऊ शकेल.

डॉ. माकणीकर असेही म्हणाले की, निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार, खासदार किंवा मंत्री पत्रकारांच्या या समश्या कधीच जाणून नाहीत. MLAs, MPs and ministers are never aware of this problem of journalists. आज देश स्वतंत्र होऊन 70 री ओलांडली तरी सुद्धा पत्रकार शासकीय योजना पासून वंचित आहेत. त्यांना पुरेसे संरक्षण नाही. त्यांच्यासाठी कोणता कायदा नाही, कोणती सोय नाही किंवा त्यांच्यासाठी कोणते आर्थिक महामंडळं नाही किंवा किंते आरक्षण नाही.

पदवीधर आणी शिक्षक मतदारसंघाच्या धर्तीवर लोकशाहीचा चवथा आधारस्तंभ मजबूतिकरणासाठी स्वतंत्र आमदार निवडणूक प्रक्रिया राबवावी. किमान 12 वी शिक्षण घेतलेल्या पत्रकाराला निवडणूक लढविण्याचा अधिकार द्यावा. शिवाय राज्यातील सहा प्रशासकीय विभागाला स्वतंत्र आमदार देऊन पत्रकाराचा मान राखावा व लोकशाही मजबूत करावी. असाही उल्लेख या मागणी निवेदनात पॅन्थर राजन माकणीकर यांनी केला आहे.