माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी सुचविलेल्या कामांची पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडून तात्काळ दखल

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि. 17 मे ):-ब्रह्मपुरी विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार आद. प्रा. अतुल भाऊ देशकर हे जनतेच्या सेवेत सदैव तत्पर राहात असतात. जनतेची छोटी मोठी कामे ते अविरतपणे करीत असतात. ब्रह्मपुरी विधानसभेचे अनौपचारिक पालकत्व स्वीकारून ब्रह्मपुरी विधानसभेसाठी लोकाभिमुख कार्य करण्यासाठी सदैव तत्पर असतात.जातीभेद, पक्षभेद, गरीब श्रीमंत,असा भेदभाव न करता गोरगरीब,दिनदलित, शेतकरी, सर्वसामान्य जनतेसाठी अविरतपणे कार्य करीत असतात.

आणि म्हणूनच ब्रह्मपुरी विधानसभेतील जनतादेखील मोठ्या स्वाभिमानाने म्हणत असतात की, ” कोई हां कर या ना कर,मगर एक बार अतुल देशकर”हा जनतेचा प्रेम आणि विश्वास बघून अतुलभाऊंना देखील जनतेप्रती कार्य करण्याची प्रचंड उर्मी प्राप्त झाली असून अतुलभाऊंनी जनतेची कामे करण्याचा जणु चंगच बांधला.अतुलभाऊ समर्पित भावनेने काम करीत आहे.

जनतेच्या भावनांची दखल घेऊन अतुलभाऊंनी मान. नाम.सुधीरभाऊंना दोन महत्त्वपूर्ण प्रश्नांची मागणी केली. १) श्री. नामदेव गोमाजी ऊरकूडे माजी सैनिक हे सन 1965 व मध्ये पाकिस्तानसोबतच्या युद्धामध्ये युद्धविराचे काम केले आहे. त्यांनी आता 1 मे 2023 रोजी वयाची 81 वर्षे पूर्ण केले आहेत .त्यामुळे त्यांना शौर्य पुरस्कार समारंभास निमंत्रित करण्यात यावे.
2) ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत व निवासस्थान इमारत बांधकामास निधी उपलब्ध करून देण्यात यावे.

वरील दोन्ही विनंती सुधीर भाऊंनी तात्काळ मान्य करून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पहिल्या सुचविलेल्या कामांची योग्य दखल घेतली आहे. असे कळविले आहे.