गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचा आगामी खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच- माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम

37

🔸वडसा- गडचिरोली व्हाया आलापल्ली- कागजनगर रेल्वे मार्ग मंजुर करण्याचे दिले आश्वासन

✒️आष्टी(पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क)

आष्टी(जि. गडचिरोली) (दि. १० जून):-स्थानिक पातळीवर लहान मोठ्या नेत्यांमध्ये अंर्तगत वाद असले तरी मतदार क्षेत्राच्या विकासासाठी मतभेद दुरु करुन नव्या दमाने कामाला प्रारंभ केला आहे. गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्राचा आगामी खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच होणार असल्याचा विश्वास माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आष्टी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजीत कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात व्यक्त केला.

महाराष्ट्राचे आघाडीचे नेतृत्व ज्यांकडे आहे त्यांनी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपणास उमेदवारी देण्याचे कबुल केले असून सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने मैदानात उतरुन आजपासूनच कामाला सुरुवात करावी. आपण पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांसाठी कसलीही कमी पडू देणार नाही. त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये युवकांची फळी तयार करुन समर्पित भावनेने काम केल्यास आगामी खासदार आपलाच राहील. आपणास माहितच आहे की, मी जे ठरवितो, ते करूनच राखवितो, त्यासाठी कार्यकर्त्यांची साथ आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.

आष्टी परिसरातील शेतकरी बांधवासाठी मक्का खरेदी केंद्र चामोर्शी येथे आहे, ते अंतर शेतकऱ्यांसाठी जास्त असुन त्यात आर्थिक खर्च जास्त व प्रवासात वेळ जातो. त्यासाठी आष्टी येथे मक्का खरेदी केंद्र सुरु करण्याकरीता प्रशासनाकडे मागणी केली आहे. लायड मेटल कोनसरी प्रकल्पामुळे आष्टी परिसरातील बेरोजगारांना न्याय मिळविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत. वडसा- गडचिरोली-आष्टी-आलापल्ली ते कागजनगर रेल्वे मार्ग मंजुर करण्याच्या कामाला आपण प्राधान्य दिले आहे असे सांगुन कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामासाठी झोकुन देण्याच्या सुचना आमदार आत्राम यांनी केल्यात.

यावेळी त्यांचेसोबत गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, रवि वासेकर, बबलु भैय्या हकीम, सौ. शाहीन भाभी हकीम, लिलाधर भरडकर, प्रणय गुरले, राहुल डांगे, सुरज सोयाम, श्रीकांत मल्लेलवार, हरिश मंगाम, निकुरे, गोसावी यांचेसह गडचिरोली जिल्हयातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते.