74 चिमूर लोकसभा मतदारसंघांच्या भाजप निवडणूक प्रमुख पदी गणेश तवैकर यांची नियुक्ती

39

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभिड(दि. 10 जून): – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणूकीच्या दुष्टिकोनातून क्षेत्रनिहाय बांधणी सुरुवात केली असुन पक्षबांधणी करिता निवडणूक प्रमुखाची नावे जाहीर केली, चिमूर 74 लोकसभा क्षेञाकरीता गणेश जैरामजी तवैकर, नागभीड यांची निवडणूक प्रमुख म्हणून निवड केली आहे, व चंद्रपुर जिल्हातील सहा विधानसभा प्रमुख पुढील प्रमाणे आहेत.

राजुरा ( 70) देवराव भोंगळे,चंद्रपुर (71) रामदास अंबाटकर,बल्लारपुर (72) चंदनसिंग चंदेल, ब्रम्हपुरी (73) अतुल देशकर, चिमूर (74) गणेश तवैकर, वरोरा(75) रमेश राजूरकर यांची निवड करण्यात आली आहे,.

महाराष्ट्रातील पक्षाच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांचे नियुक्त्या केल्या, सर्व नियुक्त प्रमुखांचे पक्षाच्या पदाधिकारी यांची अभिनंदन केले आहे.
सर्व निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करुन 2024 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपा शिवसेना युतीला विजय मिळवून देतील.