कार्यकर्त्यासोबत आमदारांची डबा पार्टी : आ.कीर्तिकुमार भांगडीया यांचा उपक्रम..!!!

48

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.11जून):-नागभीड येथील पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरासोबत आज निसर्गायन रिसॉर्ट नागभीड येथे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये डबा पार्टी आनंदी व उत्साही वातावरणात पार पडली… यावेळी पदाधिकारी,कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी निसर्गाच्या सानिध्यात डबा पार्टीचा आंनद घेतला.. तसेच विविध विषयावर आमदार साहेबांसोबत चर्चा केली….!!

भारतीय जनता पार्टीच्या सरकारला केंद्रात नऊ वर्ष झाली त्यानिमित्ताने विविध उपक्रम पक्ष्याच्या वतीने राबविण्यात येत आहेत..त्याच्याच एक भाग म्हणून या डबा पार्टी चे आयोजन करण्यात आले होते.. येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला सामोरे जायचे असून यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील नात्यातील विन घट्ट व्हावी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेता याव्या यासाठी या उपक्रमाला आमदार भांगडीया विशेष महत्व देत आहेत…!!

या प्रसंगी चिमूर विधानसभा प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल नागभीड नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष गणेश तर्वेकर यांचा सत्कार करण्यात आला.. या प्रसंगी व्यापारी संघ नागभीड चे अध्यक्ष गुलजार धमानी, बार असोसिएशन चे अध्यक्ष ऍड. रवींद्र चौधरी, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. गणपत देशमुख, नागभीड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम पाथोडे,चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर यांनी या उपक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले व आमदार साहेबांचे आभार व्यक्त केले…!!

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे केले.. या प्रसंगी नागभीड व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धमानी,सचिव विजय बंडावार, व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष हनीफ ज्यादा, भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, भाजपा नागभीड तालुका अध्यक्ष संतोष रडके,चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, नागभीड ग्राम पंचायतचे माजी सरपंच जहांगीर कुरेशी, नागभीड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अवेश पाठण, न.प.माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार,पत्रकार संघ नागभीड चे अध्यक्ष श्याम पाथोडे, सन्मा.विजय काबरा, न.प.माजी नगरसेवक शिरीष वानखेडे,दशरथ उके,रुपेश गायकवाड, ज्येष्ठ महिला नेत्या इंदुताई आंबोरकर,गीताताई धारणे,झेप निसर्ग मित्र संस्थेचे डॉ.पवन नागरे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती..!!!