कोतवाल भरतीतील परीक्षार्थीनी पुनः परीक्षा घेण्याचा निर्णय होईपर्यत न्यायसाठी पेटवलेली मशाल तेवत ठेवावी – अश्विन मेश्राम

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि. 20 जून):-बेरोजगारीने त्रस्त , नौकरी करीता धडपडत असलेल्या व परीक्षा चालान भरतांना दमछाक उड़तांना धंमं अभ्यासु विद्यार्थ्यांना कोतवाल भरती पारदर्शक होईल असे वाटले होते त्यामुळे अनेक एमपीएस व इतर स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांनी कोतवाल भरती करीता फॉर्म भरले होते त्यामुळे दिनांक 15/06/2023 रोजी कोतवाल भरती करिता नागभीड येथील गोविंद राव वारजूकर महाविद्यालय तसेच इतर काही तालुक्या मध्ये जागेनुसार पेपर घेण्यात आले होते.

त्यावेळी पेपरमध्ये पारदर्शकता राहावी करिता सेंटरमध्ये कुठलेही मोबाईल,घड्याळ, व इत्यादी साधन घेऊन जाण्यास बंदी होती, परंतु परीक्षा रूम मध्ये विद्यार्थी बसले असता, विद्यार्थ्यांना देण्यात आलेले उत्तर पत्रिकेसह प्रश्नपत्रिका संच सिलबंद पॉकेटमध्ये नव्हती, त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांच्या साहिनीशी पेपर संचाचा सील उघडण्यात आलेला नाही, आजपावेतो झालेल्या कुठल्याही पदभरती मध्ये पेपरसंच हा सील बंद असतो, परंतु इथे पेपरसंच सिलबंद नव्हते व प्रश्न आणि उत्तरे एकाच संचात होती त्यावर रोल न. विद्यार्थी ची सही घेण्यात आली परंतु रोल न. वर कुठलेही बारकोड न लावल्याने कुठल्या विद्यार्थी चे प्रश्न उत्तर संच आहे हे स्पष्ट होत असुन गैरव्यवहार करीत नंतर ही ज्याला पास करायचे होते त्याला करता येत होते.

अश्या इतर बाबीमुळे पारदर्शकता राहलेली नसुन गैरव्यवहार झाल्याने कोतवाल भरती परीक्षा रद्द करीत पुनश्च कोतवाल भरतीचे पारदर्शक रित्या पेपर घेण्यात यावे, करीता परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले होते त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी स्थगिती दिल्याने परीक्षार्थी विद्यार्थी वतीने आभार व्यक्त करीत पुनः पारदर्शक परीक्षा घ्यावी अशी मांगणी केली तसेच जेव्हा पर्यत पुनः परीक्षा घेण्याचा निर्णय होत नाही व न्याय मिळत नाही तेव्हा पर्यत परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी स्वस्थ न बसता न्यायासाठी पेटवलेली मशाल तेवत ठेवावी असे आवाहन अश्विन मेश्राम यांनी कोतवाल भरतीतील परीक्षार्थी विद्यार्थींना केले.