धरणगाव येथे समविचारी संस्था ,संघटना व पक्ष यांची संवाद बैठक संपन्न

34

🔸महाराष्ट्र जोडो अभियानाचे जळगांव येथे होणारे राज्य सम्मेलन यशस्वी होणार; गुलाबराव वाघ

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.23जून):-येथील बिजासनी जिंनिग प्रेसींग येथे समविचारी संस्था, सामाजिक संघटना व विविध पक्ष यांची संवाद बैठक आज रोजी संपन्न झाली. बैठकीचे प्रास्ताविक रणजित शिकरवार यांनी केले. या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, प्रा.करीम सालार, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, मोहन शिंदे, राम पवार, सुरेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, फारुक शेख, राजेंद्र वाघ, दिपक वाघमारे, रतीलाल चौधरी, योगेश पाटील उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सध्याची महागाई, बेरोजगारी आणि जगण्याचे प्रश्नाचे स्वैर खाजगीकरण यामुळे कष्टकरी – शेतकरी व मध्यम वर्गाचे रोजचे जगणे अवघड होत चालले आहे. शेतकऱ्याचा मालाला हमी भाव न देणे, १४ जिल्हयातील वंचितांचे रेशन बंद करणे, बेरोजगारी, महागाई, कामगार कायदा सारखा क्रांतीकारी कायदा खिळखिळा करणे, ईव्हीम ऐवजी बॅलेटवर निवडणुका घेणे, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण यासारखे मुद्दे जाणून बुजून निर्णय न लावणे, ओबीसींचे जातीनिहाय जनगणना न करणे, आदिवासी, ओबीसी वस्तीगृह, स्वाधार योजना, बहुजनांचे प्रश्न, बहुजनांना मुसलमानांच्या विरोधात पेटविणे, जाती- धर्मात तेढ निर्माण करणे, मूळ प्रश्न दाबून ठेवणे आणि धार्मिक दिशाभूल करणे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची उघड पायमल्ली होत आहे.

पोलिसांसह प्रशासनावर दबाव चंद्राच्या वापर करणे, जाती धर्मावर राजकारण समाजासाठी मारक, अश्या अनेक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जयदीप पाटील, नंदू पाटील, भागवत चौधरी, जितेंद्र धनगर, गोरख देशमुख, दिनेश भदाणे, राजेंद्र ठाकरे, सुनील सोनार, संतोष महाजन, लीलाधर पाटील, विजय पाटील, किरण अग्निहोत्री, गोपाल पाटील, भीमा धनगर, छोटू चौधरी, दिनेश पाटील, विलास पवार, गजानन महाजन, गौतम गजरे, नदीम काझी, इरफान शेख, विनोद रोकडे, देवानंद चव्हाण, फारुक शेख मास्टर, आयाज शेख, नगर मोमीन, बापू महाजन, विक्रम पाटील, गोपाल आण्णा माळी, राहुल रोकडे यांच्यासह सर्व समविचारी संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव, पुरोगामी पक्ष, बुद्धिजीवी व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील यांनी तर आभार निलेश चौधरी यांनी मानले.