गायरान जमिनीधारकांचा लढा यशस्वी करा-ईम्तियाज नदाफ

50

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड( श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सुचनेने व प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर आदेशानुसार आज वंचित बहुजन आघाडी तालुका फलटण जिल्हा सातारा यांच्या तर्फे शासकीय विश्रामगृह फलटण येथे सातारा जिल्हा राजकीय निरीक्षक ईम्तियाज नदाफ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व महासचिव तुषार बैले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वंचितचे जेष्ठ नेते सुभाषराव गायकवाड यांनी बैठकीचे आयोजन केले होते.

यामधे शुक्रवार दि २० जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनावर मुंबई येथे गायरान धारकांचा राज्यव्यापी महामोर्चा यशस्वी करण्याबाबत सातारा जिल्ह्यातून जाण्याचे नियोजन व मार्गदर्शन तुषारजी बैले यांनी केले.महाराष्ट्रातील नांदेड येथिल अक्षय भालेराव हत्याकांड परळी बीड मधील जरीन खान या संशयीताचा पोलीस कस्टडीमधे झालेला मृत्यु तसेच महाराष्ट्रातील विविध कार्यकर्त्यांच्यावर विविध ठिकाणी होणारे पुर्वनियोजित भ्याड हल्ले तसेच सातारा जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेउन पुढील वाटचालीबाबत तसेच जुन्या नव्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेउन पक्षवाढीबाबत सर्वांनी पक्षाच्या शिस्तीत एकत्र काम करण्याच्या सुचनेबरोबर ईम्तियाज नदाफ यांनी मोलाचे व योग्य मार्गदर्शन केले.

फलटण तालुक्या मधील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते समर्थक मोठ्या संखेने उपस्थित होते.जेष्ठ नेते सुभाष गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जावळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले ओबीसी समाज्याचे तुकाराम गायकवाड कन्हैय्या रीटे सतीश कांबळे सासकलचे राजाभाऊ घोरपडे गोरखनाथ मुळीक शरद घोरपडे चंद्रकांत गायकवाड बीडी घोरपडे दीनकराव जगताप अमीत गायकवाड विजय काकडे विजय कांबळे सुखदेव सिंदे सुर्यकांत कांबळे गौतम मोहिते विंचुरणी गावचे दत्तात्रेय आवाडे तसेच खंबीर नेतृत्व असणारे फलटण शहर अध्यक्ष उमेशजी कांबळे रोहित अहीवळे.शैलेश हनुमंत बिबवे शारदा हनुमंत बीबवे वडुजचे अभिजीत सरतापे अजित रायबोळे व कार्यकर्ते उपस्थित होते.महीला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा चित्रा ताई गायकवाड व फलटण शहर अध्यक्षा सपना ताई भोसले यांनी आपले विचार मांडले व महिला आघाडीचे काम वाढविण्याचा निर्धार केला