लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

67

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.3ऑगस्ट):-सेवादल विधायक कार्य समिती व सामाजिक समरसता मंच चंद्रपूर तर्फे सेवादल मुलींच्या वस्तीगृहात लोकमान्य टिळक व लोकशाहीर,साहित्य रत्न,साहित्य सम्राट, अण्णाभाऊ साठे ना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा दल विधायक कार्य समितीचे सदस्य सुभाष नरूले, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सामाजिक समरसता मंचाचे जिल्हा संयोजक डॉ. नंदकिशोर मैंदळकर, वस्तीगृहाच्या अधिक्षिका कोमल अक्केवार, गंगाधर गुरनुले, सचिन बरबटकर, कविता शेंडे, तसेच विधायक कार्य समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

टिळकांनी केसरी पेपर काढून तसेच गणपती महोत्सव सुरू करून जनमानसात स्वातंत्र्य प्रति चेतना जागविले व स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असे संबोधन इंग्रजांना आव्हान दिले व त्यांना सळो की पळो करून सोडले. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती देताना म्हणाले अण्णाभाऊ यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात त्यांच्या साहित्याचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते तसेच त्यांनी फकीरा कादंबरी लिहून समाजाची दशा व दिशा यावर चिंतन करण्यास भाग पाडले त्या माध्यमातून समाजाचे जीवन चरित्र सादर करून समाजाचा व मानव जातीचा उध्दारच केला आहे.त्यांचे कार्य मानव जातीला दिशादर्शक व प्रेरणादायी आहे.