वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये प्राध्यापक प्रबोधिनीचे उदघाटन

43

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.6ऑगस्ट):- येथील वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये दिनांक 4 / 8/2023 रोजी प्राध्यापक प्रबोधिनीचे उदघाटन बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- सैदापुरचे शाखाप्रमुख मा. श्री. प्रदीप कदम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बँक साक्षरता व आरोग्य विमा या विषयावर प्रमुख पाहुण्यानी मार्गदर्शन केले, ते म्हणाले नवीन आर्थिक धोरणात राष्ट्रीकृत बँकांनी उदारीकरणाची भूमिका घेतली आहे. त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र एक अग्रेसर बँक आहे.

याप्रसंगी बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचबरोबर मनीवाल सिग्मा हेल्थ पॉलिसी, कोल्हापूरचे क्लस्टर मॅनेजर मा. श्री. दीपक मोरे यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा किती महत्त्वाचा आहे हे सविस्तरपणे सांगून विम्याच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एन. ए. पाटील यांनी केले डॉ. डी. पी. जाधव यांनी आपले अनुभव कथन केले. प्रा. सौ. पी. एस. सादिगले यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.