भारतीय बौद्ध महासभा तालुका उमरखेड च्या वतीने चिंतन शिबिर संपन्न

49

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

ढाणकी(दि. 8 ऑगस्ट):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्हा शाखेच्या अंतर्गत उमरखेड तालुका शाखा यांच्यावतीने सुमेध बुद्धविहार यांच्यावतीने चिंतन शिबिर दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न झाले आहे.

यावेळी पूजनीय भिक्कु पट्टीसेन उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष उमरखेड तालुका अध्यक्ष उपा.धम्मदीप काळबांडे होते.

प्रमुख मार्गदर्शक यवतमाळ जिल्हा सरचिटणीस रुपेशजी वानखेडे, प्रमुख पाहुणे म्हणून समता सैनिक दल तालुका उपाध्यक्ष राजेसाहेब पंडित, तालुका उपाध्यक्ष समता सैनिक दल मिलिंद बर्डे, केंद्रीय शिक्षक धम्मदीप पाईकराव, समता सैनिक दल उमरखेड जिजाबाई खंदारे, लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेल प्रतिनिधी आत्माराम हापसे, बौद्धाचार्य गंगाधर कांबळे होते.

या शिबिराचे सूत्रसंचालन यशवंत काळबांडे सर यांनी केले तर प्रास्ताविक एस.के.मुनेश्वर सर भारतीय बौद्ध महासभा शहराध्यक्ष यांनी केले. या यावेळी भा.बौ महासभा ही एक सामाजिक संघटना आहे आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा. चिंतन शिबिर या शिबिराचे का आवश्यकता आहे.

या प्रास्ताविक मध्ये सरांनी सांगितले व त्यानंतर रुपेशजी वानखेडे यांनी चिंतन शिबिरामध्ये प्रबोधन काराची आचारसंहिता, धम्म चळवळ गतिमान करणे, भारतीय बौद्ध महासभेचे मिशन, शाखेचा लेखाजोखा, बाबासाहेबांचा संदेश घरोघरी पोहोचला पाहिजे, सर्वांनी विहारांमध्ये एकत्र आलं पाहिजे, उपासक, उपासिका, युवक युवती शिबिर, बालक अशा अनेक शिबिर राबविले पाहिजे चिंतन शिबिर यावर प्रमुख मार्गदर्शन करण्यात आले.

त्यानंतर लगेच मान्यवरांच्या हस्ते समता सैनिक दलाचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करंजी शाखेचे अध्यक्ष राजेश घुगरे यांनी केले.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी उपासक उपासिका यदि उपस्थित होते.