पुसद शहरात गुंजला महिला व युवकांचा आक्रोश

69

🔹आदिवासी कृती समितीच्या वतीने आयोजित भव्य दिव्य मोर्चात हजारोंचा सहभाग

🔸सर्व सामाजिक धार्मिक संघटनांचा मोर्चास पाठिंबा

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.9ऑगस्ट):-मणिपूर येथील महिलांची लग्न एंड काढण्या प्रकरणाचा निषेध नोंद घेण्यासाठी आणि त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याचा मागणी सोबतच भाजपच्या राज्य व केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी आज आदिवासी कृती समितीच्या पुढाकाराने भव्य आक्रोश मोर्चा महिलांच्या नेतृत्वात सर्व धर्मीय सामाजिक संघटनांच्या सहभागातून जयघोष करीत निघाला होता. सदर मोर्चा क्रांतिवीर बिरसा मुंडा चौकातून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्केट यशवंत रंगमंदिरावर पोहोचला त्या ठिकाणी सभेला मान्यवरांनी संबंधित केल्यानंतर महामहीम राष्ट्रपती महोदय,भारत सरकार, नवी दिल्ली यांना उपविभागीय महसूल दंडाधिकारी पुसद यांच्यामार्फत निवेदन सोपविण्यात आले.

यावेळी आदिवासी आक्रोश मोर्चा कृती समिती पुसद, चे अध्यक्ष माधवराव वैद्य, कार्याध्यक्ष सुनिल ढाले, उपाध्यक्ष सुरेश धनवे, सचिव नारायण कऱ्हाळे, तसेच सदस्य ज्ञानेश्वर तडसे, रंगराव काळे, ॲड रामदास भडंगे, फकीरा जुमनाके, पांडुरंग व्यवहारे, गजानन उघडे, गणपत गव्हाळे, हरिदास बोके, राजू तडसे, गजानन टारफे, सुदाम चिरंगे, संतोष गारूळे, नामदेव इंगळे, गजानन टाले, समाधान बळी, ॲड संदीप कोठुळे, लक्ष्मण पांडे, शिवाजी तोरकड प्रसिद्धी प्रमुख मारोती भस्मे, सुनीताताई मळघने, मिना व्यवहारे, शिल्पा सरकुंडे, मनिषा बेले, आशाताई पांडे, वर्षाताई वैद्य, शितल ढगे, फरझाना बि शेख रज्जाक, हमिदाबी शेख जाफर, आफिजा ल शेख शब्बीर, निशोबी, डॉ .मोहम्मद नदीम, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले, मराठा सेवा संघाचे सुधीर देशमुख, प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष किशोर कांबळे, काँग्रेस पक्षाचे डॉक्टर मोहम्मद नदीम अजय पुरोहित, शितलकुमार वानखेडे, तेहसिनी खान, भारतीय बौद्ध महासभा भारत कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे लक्ष्मण कांबळे, बाबाराव उबाळे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष आशिष काळबांडे, आदिवासीं सेवक, रामकृष्ण चौधरी, कुस्ती मल्लविद्या महासंघ नाना बेले, माजी जि .प .सदस्य परशराम डवरे आदी सह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांचा सहभाग होता.

कुकी अदिवासी आसलेल्या माजी सैनिकाच्या पत्नीसह इतर महिलांची नग्न धिंड काढून शेकडोंच्या संख्येतील नराधमांनी छेडखानी, बलात्कार, खून, असे प्रकार करून समाजात व देशात दहशत माजविणाऱ्या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या अशा प्रकारच्या मागण्या मोर्चेकरांनी केला होता.

मणिपूर च्या गंभीर घटनेनंतर कर्तव्य, जबाबदारी आणि नैतिकतेने दखल न घेणाऱ्या मणिपूर राज्य व केंद्राच्या भाजप सरकारचा जाहीर निषेधाच्या घोषणा दणाणत होत्या. मध्य प्रदेशातील भाजपा आमदाराचा कार्यकर्ता प्रवेश शुक्ला याने आदिवासी युवकाच्या अंगावर लघवी करून अमानुष अत्याचार केला आहे अशा विकृत मनोवृत्तीच्या इसमाला सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सुद्धा महिलांच्या माध्यमातून आक्रोश करीत केली जात होती. मनोहर उर्फ संभाजी भिडे याने महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह इतर महामानवांबद्दल अपशब्द वापरून सर्व भारतीयांच्या भावना दुखावले आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. त्याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. या प्रकरणी कारवाई न करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध नोंदवित भिडे विरुद्ध घोषणाबाजी करीत होते.

समान नागरी कायदा आदिवासींचा पारंपारिक, रूढी परंपरा व संविधानिक हक्क अधिकारांना मारक असल्यामुळे आदिवासींना हा कायदा लागू करण्यात येऊ नये. अशी मागणी सुद्धा राष्ट्रपतीकडे दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.मोर्चा जसा जसा समोर जात होता तसा तसा ागरिकांचा सहभाग वाढत जात होता आणि हा मोर्चेकर्‍यांचा लोंडा आणि त्यांचा आक्रोश पाहण्यासाठी पुसदकरांनी एकच गर्दी केली होती. परंतु एवढा भव्य दिव्य मोर्चा आक्रोश आकांत व्यक्त करीत मोर्चा मार्गस्थ होत होता कोणत्याही नागरिकाला कोणताही त्रास न होता मोर्चा ने यशस्वीरित्या निवेदन देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी स्वयंसेवकांनी पार पाडली होती.