तंत्रस्नेही शिक्षक संतोष नन्नावार यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

84

✒️प्रतिनिधी नागभीड(संजय बागडे)मो:-९६८९८६५९५४

नागभीड(दि.3सप्टेंबर):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार लोकविद्यालय तळोधी(बा) येथील पदवीधर शिक्षक संतोष दामोधर नन्नावार यांना जाहीर झाला आहे..येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

तंत्रस्नेही व पदवीधर शिक्षक (प्राथमिक) संतोष दामोधर नन्नावार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दी रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरीचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्ही.एस.तोंडरे, सचिव आर.एस. राऊत,व्ही.एस. बगमारे,ए.आर. नागमोती,ए.एम.राऊत,डी.पी.समर्थ,सर्व पदाधिकारी व संचालक, गटशिक्षणाधिकारी नागभीड प.स.नागभीड संजय पालवे, मुख्याध्यापक ए.वाय.बांगरे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वागत केले आहे.