कॉंग्रेसच्या जन संवाद पदयात्रेला चिमुर तालुक्यात नागरीकांचा उत्तम प्रतिसाद

250

🔹केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात नागरीक देत आहेत संतप्त प्रतिक्रिया

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि 5सप्टेंबर):-महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार संपुर्ण महाराष्ट्र जन संवाद पदयात्रा सुरू आहेत. याच अभियानाचा भाग म्हणून चिमुर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ. सतिश वारजुकर यांचे मार्गदर्शनाखाली चिमुर तालुका कॉंगेस कमेटीचे तालुका अध्यक्ष डॉ. विजय पाटील गावडे यांचे नेतृत्वात चिमुर तालुक्यात जनसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेत विविध गावात नागरीकांकडुन केंद्रातील मोदी व राज्यातील शिंदे सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रीया येत आहेत.

चिमुर तालुका कॉंग्रेस कमेटी च्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी गोंदोडा येथून प्रारंभ झालेल्या जनसंवाद यात्रेला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या यात्रेदरम्यान विविध गावात जावुन कॉंगेस पक्षाच्या वतीने मिरवणुक व सभा घेणे सुरू आहे. या सभे दरम्यान महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, आरक्षण अश्या विविध विषयांत मार्गदर्शन करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात कार्यकर्त्यांचे भाषण सुरू असतांना नागरीकां मोदी सरकार विरोधात प्रतिसाद देत आहे.

लोकशाही मार्गाने निवडून आलेले केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हुकुमशाहप्रमाणे वागत आहे. त्यांच्या अपयशी धोरणामुळे आज महागाई गगनाला भिडलेली आहे २०१४ पूर्वी ४०० रुपयाला मिळणारा गॅस सिलेंडर आज १२०० रुपयाला मिळत आहे. ७० रुपये लीटरचा खाद्यतेल आज १२० रुपये लिटर झालेला आहे, ७० रुपयाला मिळणारा डिझेल आज १०० रुपये लिटर झाला आहे आणि ७० रुपये लिटर असलेला पेट्रोल आज ११० रुपये झालेला आहे. तसेच जीवनावश्यक दूध, दही, आटा खरेदीवर GST तसेच बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले असताना फक्त नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्र राज्यातील मोठे मोठे प्रकल्प फक्त गुजरात राज्यात नेले जातात. त्यामुळे आपल्या राज्याच्या युवकांचा रोजगार हिरावल्या जात आहे. तर दुसरीकडे शेतीवर उत्पन्न दुप्पट करू व शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ असे आश्वासन देऊन नऊ वर्षा अगोदर सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांनाच आज रस्त्यावर आणून ठेवलेले आहे. अन्यायकारक असे कृषी कायदे आणल्याने देशातील देशातील हजारो शेतकऱ्यांना आपला जीवही गमवावा लागलेला आहे.

शेतीला १२ तास वीज देण्याचे आश्वासन देणाऱ्या तिघाडी सरकारच्या काळात ८ तासही वीज मिळत नाही. प्रचंड वीज दर वाढवून सर्वसामान्यांना तिघाडी सरकार लुटत आहे. भाजपा सरकार आल्यापासून शेतमालाला कधीही हमी भाव (MSP) मिळाला नाही. शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रु. देऊन खताच्या मशागतीच्या, किटकनाशकाच्या किंमतीतील खर्चात वाढ करुन शेतकऱ्यांकडून १२ हजार रुपये काढले जात आहे. याउलट शेती साहित्यांवर १८ टक्के GST लावला जात आहे. देशातील रेल्वे, वीज निर्मिती व वितरण, विमानतळे, बँका, वीमा कंपन्यांसह विविध सरकारी संस्था एकाच उद्योगपतीला विकण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे या क्षेत्रात असणाऱ्या शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण होत असून या माध्यमातून SC, ST, OBC यांचा आरक्षण हिरावण्याचा काम मोदी सरकार सरकार करत आहे. देशातील मुठभर उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयाचे कर्ज मोदी सरकारने माफ केले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. याउलट पिक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची खुलेआम लुट केल्या जात आहे. अशा आशयाचे भाषण झाल्यानंतर सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहे.

या पदयात्रेत प्रदेश कांग्रेस कमेटीचे प्रदेश महासचिव तथा माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष डॉ विजय पाटील गावंडे, जि.प. माजी अध्यक्ष डॉ. सतिश वारजुकर, कॉंग्रेस चे जिल्हा सरचिटणीस तथा जि.प. माजी सदस्य गजानन बुटके, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे संघटक धनराज मुंगले, सेवादल कॉग्रेसचे प्रा. राम राऊत, जेष्ठ नेते कृष्णाजी तपासे, रामदास चौधरी, जि.प. माजी सदस्य विलास डांगे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत बंडे, पर्यावरण समितीचे प्रदिप तळवेकर, सोशल मिडीया अध्यक्ष पप्पुभाई शेख, युवक कॉंग्रेसचे रोशन ढोक,साईस वारजूकर, नितीन सावरकर, नागेंद्र पट्टे, प्रशांत डवले, वामन डांगे, केशवराव वरखेडे, अक्षय लांजेवार, मनिष नंदेश्वर, सविता चौधरी, गीतांजली थुठे, प्रिती दीडमुठे, भावना बावनकर,कमल राऊत, प्रज्वला गावंडे, गीता रानडे, नर्मदा रामटेके, अंबादे, शहनाज शेख यांचेसह कॉग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी आहेत.