वेणूताई चव्हाण महाविद्यालयात भितीपत्रकाचे प्रकाशन

106

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि.19सप्टेंबर):-आदरणीय पी डी पाटीलसाहेब यांच्या पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त वेणूताई चव्हाण काॅलेजमध्ये त्यांच्या कार्याचा गौरव करणारे उल्लेखनीय कामकाजाची ओळख करून देणाऱ्या भितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या भितीपत्रिकांमध्ये आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांचे जीवन चरित्र आणि त्यांनी कराड नगरीमध्ये केलेल्या विकास कामांचा त्यांनी स्थापन केलेल्या विविध सहकारी संस्था यांच्या उल्लेखनीय कार्याच्या गौरव केला आहे.

या भितीपत्रकाचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे,उच्च शिक्षण मंडळ कराडचे सदस्य ॲड.सतीश पाटील यांच्या हस्ते तसेच विश्वस्त व सदस्य श्री.अरुण पांडुरंग पाटील (काका) आणि लायन्स क्लब कराडचे अध्यक्ष ॲड. विराग जांभळे यांच्या उपस्थितीत या भितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या भितीपत्रिकाचे संपादन कुमार. गणेश मिसाळ आणि इतिहास विभागाने केले होते. मार्गदर्शन प्रा.सौ.एस.आर. सरोदे, प्रा. सौ. एस.पी.पाटील व प्रा. पी. एस. चोपडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.