

✒️संजय बागडे(प्रतिनिधी नागभीड)मो:-९६८९८६५९५४
नागभीड(दि.30सप्टेंबर):- चंद्रपूर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या वतीने व कर्मवीर विद्यालय नागभीड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्काउट युनिट व राजमाता जिजाऊ गाईड युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सव सेवा प्रकल्प राबविण्यात आला.
दिनांक 28/09/2023 रोज गुरुवारला छत्रपती शिवाजी महाराज स्कॉउट युनिट व राजमाता जिजाऊ गाईड युनिट च्या सर्व विद्यार्थ्यांनी स्काउट मास्तर प्रा. किशोर नरुले व गाईड लिडर प्रा, कु. रजनी चिलबुले यांच्या मार्गदर्शनात नागभीड शहरांमध्ये प्रभात फेरी काढून सर्व गणेश मंडळाची भेट घेतली त्यात गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी निर्माल्य संकलन करण्याचे आव्हान केले सोबतच गणेश मंडळाच्या सदश्यांना व गावातील जनतेला स्वच्छतेची आ्वश्यकता याविषयी मार्गदर्शन केले व अवतीभवती असलेली घान विद्यार्थ्यांनी स्वच्छ केली त्यांना सहकार्य नगरपरिषद येथील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केलं.
स्वच्छता अभियानानंतर नगरपरिषद नागभीड या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षक मल्लाजी आत्राम सोबतच परसराम वंजारी दिलीप राऊत ढोक,मिसार ,उरकुडे ,बोरकर कुर्झेकर व ईत्तर सर्व स्वच्छता कामगार व कर्मचारी वर्ग उपस्थितीत होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन व आभार मानण्यात आले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना मल्लाजी आत्राम म्हणाले की सरकार 15 दिवस स्वच्छता पंधरवडा राबवतो परंतु आम्ही स्वच्छता कामगार मात्र संपूर्ण शहर वर्षभर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.या कार्यक्रमाला स्काऊट आणि गाईडच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा विद्यालयाचे प्राचार्य देविदासजी चिलबुले व पर्यवेक्षक उपप्रार्चाय युवराज ईडपाचे यांनी अभिनंदन व कौतुक केले