आपण समाजाचं देणं लागतो, हा सेवाभाव सर्वांनी जपावा – रामदास पाटील सुमठाणकर

83

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि. 7 ऑक्टोंबर):-“वसुधैव कुटुम्बकम “उक्ती प्रमाणे, आजही निस्वार्थ भावनेने समाजासाठी जगणारे काही लोक आपण आपल्या अवतीभवती बघतो.समाजासाठी अहोरात्र झिजणारा, लढवय्या योद्धा म्हणून रामदास पाटील सुमठाणकर बिटरगाव बु व बंदीभाग परिसरात मान्यता पावत आहेत.

संघटनात्मक बैठकीसाठी दिनांक 4ऑक्टोंबर रोजी बिटरगाव येथे, रामदास पाटील सुमठाणकर आले होते.या बैठकीत बिटरगाव परिसरातील नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आणि उद्बोधन केले.

या बैठकीसाठी बिटरगाव परिसरातील जवळपास 200 ते 300 युवक उपस्थित होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना रामदास पाटील यांनी, राष्ट्र सर्वप्रथम यावर जोर दिला.

उपस्थितांना त्यांनी आपण समाजाचे देणे लागतो हा सेवाभाव सर्वांनी जपावा, आणि आपलं राष्ट्र कणखर आणि मजबूत करण्याकरिता, मोदींच्या नेतृत्वात, अखंड राष्ट्राच्या विचारावर आपण सर्वांनी मिळून काम करायला हवं, राष्ट्र जर टिकलं तरच आपण टिकू…

हा महत्त्वपूर्ण संदेश या बैठकीत रामदास पाटील सुमठाणकर यांनी सर्व युवा वर्गास दिला. याबरोबरच जे युवक शिक्षण घेत आहेत, त्यांनी केवळ आणि केवळ शिक्षणावर लक्ष देऊन, आपलं ध्येय साध्य करावं.

शिक्षण घेणाऱ्यांनी सद्यस्थितीत तरी समाजकारणात पडू नये. ज्यांचं शिक्षणाचं वय संपलं आणि जे आता पूर्ण वेळ व्यवसायाकडे वळले, त्यांनी मात्र थोडा वेळ समाजासाठी द्यावा. असेही प्रतिपादन रामदास पाटील सुमठाणकर यांनी यावेळी केले.

याबरोबरचं युवकांनो आपल्या पाठीशी कुणीच नाही अशा गैरसमजात खचून जाऊ नका. भारतीय जनता पक्ष व रामदास पा. सुमठाणकर कधीही, केव्हाही, कुठेही तुमच्या बरोबरचं आहे. असे आव्हानही करण्यात आले.

रामदास पाटील सुमठाणकर हे व्यक्तिमत्व म्हणजे उच्चशिक्षित, उच्चविद्याविभूषित होय. त्यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास,2006 ते 2009 लातूर पोस्ट ऑफिसला सहाय्यक म्हणून नोकरी, 2009 ला एमपीएससी पास होऊन मुख्याधिकारी म्हणून निवड. 2010 ते 2012 सहाय्यक आयुक्त म्हणून अकोला महानगरपालिकेवर वर्णी 2012 ते 2014 नगरपालिका किनवट येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यकाळ. 2014 ते 2016देगलूर नगरपालिकेवर मुख्याधिकारी 2016 ते 2020 हिंगोली नगरपरिषदेवर मुख्याधिकारी म्हणून कार्य. या कार्यकाळात त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांच्या या निर्णयावर राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान सुद्धा झाला. यानंतर त्यांनी समाज कार्य करण्याचे ठरविले.

नोकरीला राजीनामा देत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, भाजपा दिव्यांग आघाडीच्या प्रदेश प्रभारी पदी त्यांची वर्णी लागली. आणि सद्यस्थितीत ते हिंगोली लोकसभेचे प्रभारी म्हणून कार्य करीत आहेत.

या कार्यकाळात सलग तीन वर्षापासून दिवस रात्र प्रवास करून, लोकसभेतील जनतेच्या समस्या ऐकणे, ज्या शक्य असतील त्या सोडवणे. हे कार्य त्यांचे आजतागायत निरंतर सुरू आहे. एका अर्थाने हिंगोली लोकसभेला भविष्यात उच्चशिक्षित, उच्चविद्याविभूषित, तळागाळातील सामान्य लोकांमध्ये वावरणारा चेहरा नक्कीच भेटणार?

ढाणकी व बंदी भाग परिसराचा रामदास पाटील सुमठाणकर यांच्या माध्यमातूनच उदयकाळ निश्चित होणार. अशी चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात रंगली आहे. आता नागरिकांनी सुद्धा निर्णय घेणे गरजेचे आहे.

प्रस्थापित, धनदांडगे, राजकीय वारसा असलेले राजकारणी निवडून द्यायचे का? रामदास पाटील सुमठाणकर यांच्या सारखा उच्चशिक्षित, सरकारी कार्यालयीन गाढा अभ्यास असलेला विकासाभिमुख चेहरा निवडायचा.नक्कीच जनता सुज्ञ आहे.

सद्यस्थीतीत सर्वसामान्य व सर्वमान्य रामदास पाटील सुमठाणकर यांच्याकडेच बिटरगाव बु व बंदी भागातील जनतेचा कल दिसत आहे.