वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये ‘एल. आय. सी.- एक करियर’ परिसंवाद संपन्न

80

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि.11ऑक्टोबर):-वेणूताई चव्हाण कॅालेज, कराडमध्ये IQAC सेल, वाणिज्य मंडळ आणि वाणिज्य विभाग व
एल. आय. सी. कराड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने “एल. आय. सी. – एक करियर” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला.

सदर परिसंवादात श्री राजेंद्र पवार, मुख्य प्रबंधक, एलआयसी कराड शाखा यांनी एलआयसी तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा आणि भर्ती प्रक्रिया याबद्दल विदयार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच एलआयसी बद्दल माहिती देऊन त्यांचा अनुभव प्रवास मांडला. श्री नितीन भोसले सहाय्यक प्रबंधक, एल.आय.सी. कराड शाखा यांनी विमा क्षेत्राचे विकास व महत्व आणि विमा सल्लागार कसे बनता येते, याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. श्रीमती डॉ. एस.आर. सरोदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर परिसंवादाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. श्रीमती एस. सी. भस्मे, वाणिज्य विभागप्रमुख यांनी केले. त्यानंतर पाहुण्यांचे परिचय प्रा. श्री. एम. एस. बागवान अध्यक्ष वाणिज्य मंडळ यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. श्री.व्ही. पी. धुमाळ आभार प्रदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि वाणिज्य विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.