विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांचे मरणोत्तर अवयव व देहदान

109

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.20ऑक्टोबर):-संविधान प्रचार, प्रसारक समाजभूषण डॉ. राजन माकणीकर यांनी वयाच्या 25 व्यक्ती वर्षी मरणोत्तर अवयव व देहदानाची घोषणा करून आज वयाच्या 45 व्या वर्षी अधिकृत रित्या नाव नोंदणी केली आहे.

डॉ. माकणीकर यांनी अवयव दाणासाठी ट्रान्स प्लांटेन्शन ऑफ ह्यूमन ऑर्गन ऍक्ट (HOTA) 1994 या कायद्यानव्ये मृत शरीरातून डोळे फुफुस मूत्रॅपिंड याकृत कॉरनिया त्वचेच्या पेशी आदी व इत्यादी अवयव दान करण्याची प्रतिज्ञा घेतली असून तसें प्रतिज्ञापत्र हि त्यांनी भारत सरकारच्या आरोग्य विभागाला दिले आहे.

डॉ. माकणीकर एक निर्भीड आंबेडकरी निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, डॉ. माकणीकर यांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधात ज्या प्रकरणात हाथ घातला ते प्रकरण योग्यरित्या हाताळून न्याय देण्याचा प्रयन्त केला आहे. आपल्या निष्पक्ष आणि सडेतोड लिखाणामुळे ते त्यांचा दबदबा कायम आहे.

वडील पॅन्थर रिपब्लिकन नेते दिवंगत ईश्वर कांबळे यांच्या स्मृतिपित्यर्थ के. ईश्वर फॉउंडेशन नावाचे NGO स्थापन करून ते गरिबांना मोफत आरोग्य चिकित्सा, प्राथमिक शालेय शिक्षणासाठी इयत्ता पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शिक्षण शिकवतात. अत्यंत कमी दरात व माफक सवलतीत विविध कोर्सेस चे प्रशिक्षण देतात तसेच संविधान साक्षरता अभियान चालवतात.