राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत सचिन सूर्यवंशी यांना सिल्वर पदक

152

 

धरणगाव अप्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव – येथील सारजाई दामोदर कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक यांनी अमरावती येथे आयोजित द्वितीय राज्यस्तरीय खेलोमास्टर्स गेम्स स्पर्धेत 5 किलोमीटर चालणे (50 +men) ॲथलेटिक्स स्पर्धेत सिल्वर पदकाची कमाई केली असून त्यांची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती महाराष्ट्र खेलोमास्टर्स गेम्स असोसिएशन व अमरावती जिल्हा खेलोमास्टर्स गेम्स असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने दि 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान आयोजित द्वितीय महाराष्ट्र राज्य खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत विद्यालयाचे क्रीडाशिक्षक सचिन सूर्यवंशी यांनी सहभाग नोंदवून यश संपादन केले. स्पर्धेचे उद्घाटन खासदार नवनीत राणा यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख तर प्रमुखअतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले ,आमदार बळवंत वानखेडे ,माजी महापौर विलास इंगोले यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्या अंजली ठाकरे यांनी तर सूत्रसंचालन शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ नितीन चव्हाळे यांनी केले. सरांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया, सचिव प्रा रमेश महाजन तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले. शालेय स्तरावरती प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील व मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी क्रीडाशिक्षक सूर्यवंशी यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.