शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जाॅब ट्रेनिंग अंतर्गत प्रशिक्षण

77

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि. 12 जानेवारी):-औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथील इलेक्ट्रिशियन द्वितीय वर्षातील 37 प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग अंतर्गत 150 तासाचे इलेक्ट्रिशियन चे प्रशिक्षण तुमसरे इलेक्ट्रिकल वडगाव रोड, यवतमाळ यांनी दिले.

सदर प्रशिक्षणाचा कालावधी दिनांक 5/12/2023 ते 30/12/2023 असा असून एकूण 37 प्रशिक्षणार्थीनी तुमसरे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ या संस्थेचे प्राचार्य माननीय श्री. व्ही. जे. नागोरे साहेब , श्री. पी. व्ही. कडू व श्री. जी. पी. ठोंबरे इलेक्ट्रिशियन या व्यवसायाचे शिल्पनिदेशक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रशिक्षणार्थ्यांना वरील कालावधीत सागर महादेवराव तुमसरे तसेच त्यांची टिम नारायण तुमसरे, विशाल अतकरी, पंडीत बाभळे, कमलेश मते, रुशिकेश बांम्टकर इत्यादी उपस्थित होते. दुसरे यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्याने त्यांना या संस्थेचे प्राचार्य माननीय श्री. व्ही.जे. नागोरे साहेब यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.