गंगाखेड येथे राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयती साजरी

96

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)

गंगाखेड(दि.13जानेवारी):-राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक जयंती निमित्त गोल्डन ड्रीम इंग्लिश स्कूल च्या वतीने महिला सशक्तीकरण पदयात्रे निमित्ताने लॉयन्स क्लब गंगाखेड शाखा गोल्डसिटी तर्फे पाणी आणि चॉकलेटचे वाटप विद्यालयातील विद्यार्थ्यांना अहिल्याबाई होळकर चौक जुने भाजी मार्केट गंगाखेड येथे करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लबचे झोन चेअर पर्सन लॉ.अतुल गांजेवार,कॅबिनेट ऑफिसर लॉ.गोविंद रोडे,सचिव लॉ.भगत सुरवसे,कोषाधक्ष लॉ. मकरंद चीनके,संचालक अनिलशेठ यानपल्लेवार,अजय बंग,गजानन महाजन,ओम कोटलवार,संदीप राठोड,शेख मेहमुद,महेंद्र वरवडे,गणेश ओझा आदीसह लॉ.सदस्य यांची उपस्थिती होती.