पुष्कर जोग, भटशाहीच्या पेकटात लाथ घालाल का ?

130

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यात सर्व्हेचे काम सुरू आहे. शासनाचे कर्मचारी घरोघर जाऊन सर्व्हे करत आहेत. हाच सर्व्हे करताना पुण्यात दोन घटना घडल्या. दोन्हीही घटना या सर्व्हेशी संबंधीत आहेत. योगायोग म्हणजे केतकी चितळे आणि पुष्कर जोग या दोघांनी आपल्या अविवेकी अकलेचे तारे तोडले आहेत. केतकी नेहमीच केकाटत असते. तिच्या विकृत पिचका-याकडे कुणी फारसं लक्ष देत नाही. तंबाखू-गुटखा खाणारांच्या पिचका-या आणि केतकीच्या पिचका-या एकाच लायकीच्या. त्यामुळे तिला कुणी गांभिर्याने घेत नाही. पण पुष्कर जोगही तिचा भाऊच निघावा का ? केतकी जात विचारणा-या महिलेला तिची जात विचारतेय आणि ‘तुम्ही आमच्यावर अँट्रॉसिटी टाकू शकत नाही !” म्हणत सर्व्हेची खिल्ली उडवतेय तर दुस-या प्रसंगात अभिनेता पुष्कर जोग घरी सर्व्हेसाठी आलेल्या महिलांनी जात विचारल्याने संतापले. “जोग बोलणार !” अशी टँगलाईन देत, “महिला नसत्या तर लाथ घालून बाहेर काढले असते !” असे त्यांनी म्हंटले आहे. केतकी चितळे आणि पुष्कर जोग या दोघांच्याही बोलण्यात मस्ती आणि जातीय अहंकाराचा दर्प येतो आहे. तो त्यांच्यात असणे साहजिकही आहे.

पुष्कर जोग असेच व्यक्त होणार. जोग असेच बोलणार. हजारो वर्षापासून वारसा हक्काने मिळालेला जातीय वर्चस्वाचा ‘अहं’ असाच बाहेर येतो. पुष्कर जोग यांना जातीचा इतकाच राग असेल तर त्यांनी भारतात हजारो वर्षापासून माजलेल्या जातीय हागणदारी विरूध्द बंड करावे. ही हागणदारी पोसणा-या भटशाहीला त्यांनी भिडावे. परवाच्या घटनेच्या निमित्ताने जोग यांच्या बाबतीत काही प्रश्न पडले आहेत.

पुष्कर जोग यांना जात विचारल्याचा इतकाच राग येत असेल तर त्यांनी स्वत:ची जात त्यागली आहे का ? इथल्या जाती व्यवस्थेविरूध्द त्यांनी बंड पुकारले आहे का ? हजारो वर्षापासून इथं पोसलेल्या जातीय व्यवस्थेला व ती पोसणा-या भटशाहीला सुरूंग लावायला जोग पुढे येणार आहेत का ? दारात सरकारी काम म्हणून सर्व्हे करायला आलेल्या लोकांच्या पेकटाथ लाथ घालण्याची भाषा करण्यापेक्षा ज्यांनी जात पोसली, ज्यांनी जात रूजवली, वाढवली त्या ब्राम्हणशाहीच्या पेकटात लाथ घालायला पुष्कर जोग पुढे येतील का ? जी केतकी चितळे “आम्ही चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण आहोत !” म्हणून आपली ओळख सांगते ती केतकी चितळे आपली जात सांगताना ज्या घमेंडीत बोलते त्या घमेंडीच्या पेकटात लाथ घालायला जोग पुढे येतील का ? पुष्कर जोग यांच्यात खरेच दम असेल तर त्यांनी हजारो वर्षापासून या देशात माजलेल्या ब्राम्हणशाहीच्या पेकटात लाथ घालायला पुढे यावे. इथली ब्राम्हणशाहीच भारतातल्या सगळ्या सामाजिक आजारांचे मुळ आहे. इथली ब्राम्हणशाही जर उखाडून फेकली गेली तर या देशातले सगळे सामाजिक आजार आपोआप बरे होतील. सगळा भारतीय समाज सुखाने नांदेल. ब्राम्हणशाही नावाच्या कँन्सरने भारतीय समाज सडला आहे. “जोग बोलणार !” असे म्हणणारे पुष्कर जोग यावर बोलतील का ? जोग या प्रवृत्तीच्या पेकटात लाथ घालतील का ? यावर बोलण्याची, त्याचा निषेध करण्याची पुष्कर जोग यांच्यात हिंमत आहे का ?

मागे एकदा पुण्यात जातीयवादी मस्तीचा व विकृतीचा माज दाखवणारा प्रसंग घडला होता. मराठा समाजाच्या एका महिलेला ब्राम्हण असणा-या खोले बाईंनी जातीवरून अपमानीत केले होते. खोले बाईंच्या डोक्यात जात नावाची विकृत हागणदारी दिसून आली.

जातीवरून हिणवणा-या खोले बाईंचा निषेध करायला पुष्कर जोग त्यावेळी पुढे आले होते का ? त्यावेळी ‘जोग बोलणार !’ असे म्हणत सोशल माध्यमात जोग व्यक्त झाले होते का ? सर्व्हे करायला आलेल्या महिला किंवा पुरूष हे नोकर आहेत. त्यांना जे काम दिले आहे ते त्यांना करावेच लागेल. त्यांची इच्छा असो वा नसो त्यांना ते काम म्हणून करावे लागणार कारण ते आदेशाचे ताबेदार आहेत. पुष्कर जोग यांना खरेच जातीचा व जात व्यवस्थेचा राग असेल तर त्यांनी या व्यवस्थेच्या मुळावर घाव घालायला पुढे यावे. परवा नोकर महिलांना लाथ घालायची भाषा करणारे जोग टिनपाट वाटतात. ही केवळ पोकळ व फालतू फुशारकी आहे. चौकात कुणीतर दगड मारला की घराच्या अंगणात जाऊन दंगा करण्यातला हा प्रकार आहे. ज्याच्यात हिम्मत आहे तो चौकातच दंगा करतो, तिथेच भिडतो. जोग यांचा परवाचा प्रकार दारात नव्हे तर घरात येवून दंगा करण्यासारखा आहे. जखम काखेत असताना पुष्कर जोग जांघेत औषघ लावू पाहतायत. पुष्कर जोग यांना खरेच जातीचा व जात व्यवस्थेचा राग असेल तर त्यांनी पहिली स्वत:ची जात त्यागावी. जातीय वर्चस्वाचे सगळे फायदे लाटत फुकाचे बंड करण्याचा आव आणू नये. जर या व्यवस्थेविरूध्द खरेच बंड करावयाचे असेल तर भारतातल्या ब्राम्हणशाहीच्या पेकटात लाथ घालायची हिम्मत करावी. देशात समतेचं राज्य यावे यासाठी काम करावं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसतेच्या नौटंकीत आणि बुध्दांच्या समतेत फरक आहे. हा फरक पुष्कर जोग यांनी समजून घ्यावा. ब्राम्हण्याचा माज असलेल्या विकृतांनी या देशात हजारो वर्षापासून अक्षरश: हैदोस घातला आहे. हा हैदोस अजूनही थांबलेला नाही. संत कबीर, महात्मा बसवेश्वर, संत तुकाराम तसेच दाभोळकर, पानसरे यांच्या हत्या याच जातीय हैदोसातून झालेल्या आहेत. म्हणूनच इथली ब्राम्हणशाही उखाडून फेकावी लागेल. ती समूळ नष्ट करावी लागेल. यासाठी पुष्कर जोग काम करतील का ? पश्चाताप म्हणून स्वजातीय बदमाशीच्या पेकटात लाथ घालायला सरसावतील का ? पुष्कर जोग या पुर्वीच्या सगळ्या नालायकीवर, स्वजातीय बदमाशीवर किती बोलले ? ‘जोग बोलणार !’ म्हणून त्यांनी त्या विरूध्द बंड पुकारले होते का ? जोग त्यावेळी बोलले नसतील, व्यक्त झाले नसतील तर आत्ता ते जे बोलले आहेत ती केवळ नौटंकी आहे असेच म्हणावे लागेल.