श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे सत्कार समारंभ संपन्न.

78

 

अमरावती ( प्रतिनिधी )
श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्था, अमरावती तर्फे आयोजित सर्वोदय कॉलनी येथील संस्थेच्या ऑफिसमध्ये श्री पी.बी.वानस्कर ( ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ) यांच्या अध्यक्षतेत नुकताच सत्कार समारंभ संपन्न झाला.
सर्वप्रथम अध्यक्षांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रा.अरुण बुंदेले यांनी ” भीमराव ” या अभंगाचे गायन केले.
गुरु रविदास पतसंस्था, गोपाल नगर,अमरावतीच्या उपाध्यक्षपदी नगरसेवक श्री संजय वानरे, सचिवपदी श्री दिनेश चापके ( सामाजिक कार्यकर्ते ),
श्री अनिल भागवतकर ( अध्यक्ष,श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्था अमरावती,पालक संचालक , नवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अमरावती, सामाजिक कार्यकर्ता)यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल सर्व नवागतांचा श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्था अमरावती तर्फे पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व हार देऊन भावपूर्ण सत्कार केला.
याप्रसंगी प्रा.अरुण बुंदेले, अनिल भागवतकर ,गोपाल चंदन,संजय गव्हाळे, दिनेश भागवतकर,दिनेश चापके यांनी मनोगत व्यक्त केले .
याप्रसंगी श्रीकृष्ण मोहोकर, गणेश भागवतकर,रमेश भटकर, संजय खंडारे,विशाल इंगळे, प्रभाकरराव बुंदिले,मधुकर विरूळकर व समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कृष्णा मोहोकर तर आभार संजय खंडारे यांनी मानले.