पुसद येथे बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन

381

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद: दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ पश्चिमच्या अंतर्गत तालुका शाखा पुसद यांच्या वतीने दि.२० मे ते २९ मे पर्यंत दहा दिवशीय बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन पारमिता बुध्दविहार महाविरनगर पुसद येथे करण्यात आले आहे.

तालुका शाखा व शहर शाखा पुसद यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून दहा दिवसीय बौध्दाचार्य श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिराचे दरवर्षी आयोजन करण्यात येते त्याचप्रमाणे या वर्षी सुध्दा बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये वयोगट २१ ते ५० वर्षे या वयोगटातील इच्छुक पुरुषांनी आपल्या नावाची नोदणी लवकरात लवकर करून घ्यावी. शिबिरार्थी संख्या ३०असेल.संपर्कासाठी भारतीय बौध्द महासभा जिल्हा अध्यक्ष मोहन भवरे ९४०३७४०१७०, सरचिटणीस रुपेश वानखडे ९५५२१२३०८६ , शहराध्यक्ष एल. पी. कांबळे ९६८९३६५७२३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तालुकाध्यक्ष पुसद भारत कांबळे ९७६७१८९२५३ यांनी केले आहे.