मिशन पाॅझिटिव्ह सोच ही कोरोना वर मात करणेची सुत्रे

  39

  आजपर्यंत कोरोनाची लागण होऊन मृत्यूचा आकडा हा या साथीतून बर्या होणार्या आकड्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. एकंदरीत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्याही वाढत असली तरी बरे होणार्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे.
  जेव्हा एखादी व्यक्ती कोरोना विषाणूबाधित होते त्यावेळी समाज एका वेगळया नजरेने पाहु लागतो. कुंटुबियाना वाळीत टाकल्यासारखे समाज पाहु लागतो.कोरोना हा रोग आहे पण त्याचा राग करणे बरोबर नाही. मिशन पॉझिटिव्ह सोच’ हे अभियान जनतेच्या मनात सकारात्मक सद्भाव निर्माण करेल,असे मत राज्य राखीव पोलीस दलाचे सहाय्यक समादेशक शिवाजीराव जमदाडे यांनी व्यक्त केले.
  या आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्यापासून रोखायचे असेल तर जनतेने स्वत:हून काळजी घेत सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीने वावरले पाहिजे. कोरोनाचा संसर्ग खूप आव्हानात्मक आहे. लोकांनी अतिशय काळजी घेण्याची गरज आहे. सुरक्षिततेसाठी शासनातर्फे जे काही नियम, आदेश दिले जात आहेत ते कसोशीने पाळले पाहिजेत.
  “मिशन पॉझिटिव्ह सोच’ या अभियानाचा मूळ उद्देश लोकांच्या मनात या आजाराविषयी असलेली भीती घालवून परस्परांबद्दल विश्वास निर्माण व्हावा असा आहे. यात ज्या कोविड योद्धांनी या आजारावर मात केली त्यांचे अनुभव त्यांच्याच बोलण्यातून लोकांपर्यंत पोहचावेत असा प्रयत्न केला गेला पाहीजे.
  अलीकडच्या काळात व्हाट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चुकीचे संदेश व्हायरल होत असल्यामुळे जनतेत कोरोना आजाराविषयी जनतेच्या मनात भीती व घृणास्पद भावना वाढीस लागली आहे. याची बाधा ज्यांना होते त्यांच्याविषयी अनेक गैरसमज सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने व्हायरल केले जात आहेत. ज्या व्यक्ती या आजाराने बाधित होत आहेत त्यांना वेगळ्या मानसिक स्थितीतून जावे लागते. शिवाय ज्या कुटुंबात बाधित व्यक्ती आढळतो त्या कुटुंबाबद्दलही अनेक गैरसमज समाजात निर्माण होत असल्याने हा आजार आता एका मानसिक आव्हानावर येऊन ठेपला आहे.
  डी वाय एस पी जमदाडे पुढे म्हणतात की, “आजार कोणालाही होऊ शकतो. पण या आजारावर आपण मिळून लढलो तर त्यावर मात करू शकतो. ‘हा आजार झाला म्हणजे मरणारच’ ही जी भीती लोकांच्या मनात आहे, जो गैरसमज आहे तो दूर व्हायला हवा. व्यवस्थित काळजी घेतली तर या आजाराचा संसर्ग आपण टाळू शकतो. आजारी पडलोच तर व्यवस्थित आणि वेळीच उपचार घेऊन बरेही होऊ शकतो हा आत्मविश्वास लोकांमध्ये येणे गरजेचे आहे.आमच्यामध्ये खूप शक्ती आहे आम्ही सर्वकाही करू शकतो पण तरीही आम्ही काहीही करू शकत नाही, अशा प्रकारची निराशात्मक स्थिती घालवली पाहीजे.
  याबद्दल डी वाय एस पी जमदाडे यांनी काही टिप्स सांगितल्या,
  १. दुसऱ्या शी बोलताना अंतर ठेवून बोलणे.
  २. जनसंपर्कात असताना मास्कचा वापर करणे.
  ३. चुकून हातोहात कोणत्याही वस्तूचा व्यवहार झाल्यास हात साबणाने स्वच्छ धुऊन घेणे.
  ४. नाक, डोळे तोंडाला हात लावताना हात स्वच्छ असण्याची काळजी घेणे.
  ५. घरामध्ये असताना ताप, थंडी, खोकला, थकवा किंवा श्वासाचा त्रास होत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
  ६. वरील पैकी कोणताही त्रास आढळल्यास घाबरून जाऊ नका उपचारासाठी डॉक्टरांकडे जावे.
  ७. जनतेशी काही घेणे देणे नाही असे समजून आपला आजार न लपवता डॉक्टरांना भेटा व वेळ पडल्यास कोरोना टेस्ट करून घेणे.
  ८. कोरोना वरती मात करायची असेल तर न घाबरता घरी राहा व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा हाच कोरोना वरती रामबाण उपाय आहे.
  समाजातील सर्व जनतेस विनंती आहे की कोरोना बाधित किंवा संशयित व्यक्ती हा गुन्हेगार नाही तो पीडित आहे. त्याला धीर द्या त्याला वाळीत टाकू नये. त्याला आपल्या आधाराची व सहानुभूतीची गरज आहे. कोरोना मुक्त व्हायचे असेल तर वरील गोष्टींची काळजी घ्यावी असे मत राज्य राखीव पोलीस दलाचे सहाय्यक समादेशक शिवाजीराव जमदाडे यांनी व्यक्त केले आहे.

  ✒️शब्दांकन:-श्री अनिल पाटील, पेटवडगाव, कोल्हापूर