🔹सरपंच श्रीकृष्ण कुटे यांच्यासह गावकऱ्यांनी केला आबांचा सत्कार

✒️समाधान गायकवाड(माजलगाव प्रतिनिधी)मो:-8552862697

माजलगाव(दि.3सप्टेंबर):-बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याचे नाव आज आबांनी मुंबईत गाजवल असून त्यांची मुंबई येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी अशोक आबा डक यांची निवड झाली त्याबद्दल आबांचा सत्कार करताना भाटवडगाव येथील सरपंच श्रीकृष्ण कुटे बोलताना म्हणाले आबा तुम्ही माजलगाव तालुक्याचं नाव जिल्ह्यातच नव्हें तर मुंबईत गाजवल.
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये अशोक आबा डक यांच्या निवडीची चर्चा आहे माजलगाव तालुक्यात पक्षाशी तसेच आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्याशी एकनिष्ठ राहून आज पर्यंत आबांनी गोरगरीब जनतेची कामे केली मात्र आज त्याचे फळ त्यांना मिळाले आज तालुक्याचं नाव मुंबईमधे गाजवले. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या मुंबई कृषि उत्पन्न बाजार समतीच्या सभापदी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अशोक आबा डक माजलगाव येथे आले असता भाटवडगावचे सरपंच श्रीकृष्ण कुटे तसेच उपसरपंच जमिल भाई शेख ,माजी प.स सदस्य दिपक साळवे,ग्रा.प सदस्य दादाराव अनभुले, केशवभाऊ जाधव, रमेश कुटे, शब्बीर भाई शेख, बि.के जाधव, दत्ता ढेपे, सोमेश्वर आण्णा कुटे तसेच गावातील नागरिकांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED